Coronary Heart Disease : सध्याच्या धावपळीच्या जीवनात जास्तीत जास्त लोक आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेणं विसरतात. पण विषय जेव्हा हृदयसंबंधी रोगांचा येतो तेव्हा जास्त सावध रहावं लागतं. अलिकडे हृदयरोगांमुळे मृत्यूंची संख्या खूप वाढली आहे. अशात डॉक्टर हृदय निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे सल्ले देत असतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, रोज एक ग्लास बिटाचा ज्यूस प्यायल्याने हृदयासंबंधी रोगांचा धोका टळतो.
या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, रोज एक ग्लास बिटाचा ज्यूस प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये होणारी सूज कमी होते. रक्तवाहिन्यांमध्ये सूज सामान्यपणे हृदयासंबंधी समस्यांनी ग्रस्त लोकांमध्ये जास्त बघण्यास मिळतात. यामुळेच हार्ट अटॅकही येतो.
रोज बिटाचा ज्यूस प्यायल्याने कोरोनरी हार्ट डिजीजसारख्या हृदयासंबंधी रोगाचा धोका टळतो. हा सगळ्यात कॉमन हृदयाचा आजार आहे. यात हृदयाच्या धमण्या ब्लॉक होतात आणि हृदय काम करणं बंद करतं. हार्ट अटॅक येण्याचं हे सगळ्यात कॉमन कारण आहे.
ज्या लोकांच्या शरीरात नायट्रिक ऑक्साइडचं प्रमाण कमी होतं. त्यांच्या कोरोनरी हार्ट डिजीजचा धोका वाढत जातो. शरीर नैसर्गिक रूपाने नायट्रिक ऑक्साइड रिलीज करतं आणि हे आरोग्यासाठी फार गरजेचं असतं. याने ब्लड प्रेशर रेग्युलेट होण्यासोबतच रक्तवाहिन्यांमधील सूजही नियंत्रित राहते.
या रिसर्चला लीड करणारे लंडन क्वीन मेरी यूनिवर्सिटीतील डॉ. असद शब्बीर म्हणाले की, शरीराला जखमा आणि इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी सूज गरजेची आहे. ते म्हणाले की, कोरोनरी हार्ट डिजीज असणाऱ्या लोकांना सतत सूजेमुळे नुकसान होतं. याने हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. ते पुढे म्हणाले की, रिसर्चमधून असं आढळून आलं की, रोज बिटाचा ज्यूस प्यालल्याने आपल्या शरीराला इनऑर्गेनिक नायट्रेट मिळतं. ज्याने शरीराला मदत मिळते.
रिसर्च करणाऱ्या टीमने 114 लोकांवर हा रिसर्च केला. यातील 78 लोकांना त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये सूज वाढवण्यासाठी टायफाईडची वॅक्सीन दिली. तेच 36 लोकांना एका सामान्य क्रीम दिलं. ज्याने त्यांच्या शरीरावर जखमा आणि सूज निर्माण करेल.
या लोकांना सतत सात दिवस सकाळी 140 मिली बिटाचा ज्यूस पिण्यास देण्यात आला. यातील अर्ध्या लोकांना बिटाचा असा ज्यूस देण्यात आला ज्यात नायट्रेटचं प्रमाण अधिक होतं. बाकीच्या ज्यूसमध्ये नायट्रेट नव्हतं.