Before Heart Attack Symptoms: लाइफस्टाईलमध्ये बदल आणि खाण्या-पिण्याच्या खराब सवयी यामुळे लोकांच्या जीवनात मोठा बदल होत आहे. हेच कारण आहे की, जास्तीत जास्त लोक हार्ट अटॅकचे शिकार होत आहेत. काही लोक हार्ट अटॅकची कारणं आणि लक्षणं याकडे इतकं दुर्लक्ष करतात की, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशात हार्ट अटॅक येण्याआधी कोणती लक्षणे दिसतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
कधी येतो हार्ट अटॅक?
हार्ट अटॅकची समस्या तेव्हा होते जेव्हा हार्ट कोणत्या एका भागात रक्तप्रवाह बंद होतो. किंवा असू म्हणू शकता की, या भागातील अवयवांना रक्त पुरवठा होत नाही. अशात जेव्हा रक्त पुरवठा बाधित होऊन बराच काळ झाला असेल तर तेव्हा हार्ट मसल्स डॅमेज होऊ लागतात. अशात स्थितीत हार्ट अटॅक येण्याचा धोका जास्त असतो
हार्ट अटॅक येण्याआधीची लक्षणे
- हार्ट अटॅक येण्याआधी छातीत वेदना आणि अवस्थता जाणवतो. अशात जास्त उशीर न करता लगेच डॉक्टरांशी संपर्क करा किंवा डॉक्टरांना भेटा.
- काही लोकांना हार्ट अटॅक येण्याआधी चक्करही येते, सोबतच कमजोरी जाणवू लागते. अचानक खूप घाम येत असेल तरीही सावध राहणं आवश्यक आहे.
- विनाकारण फार जास्त थकवा येणे, मळमळ होणे आणि उलटी होणे ही सुद्धा हार्ट अटॅकआधी दिसणारी लक्षणे आहेत. महिलांमध्ये जास्तकरून हीच लक्षणे दिसतात.