सध्याच्या काळात वजन वाढण्याची समस्या महिलांसह पुरूषांना सुद्धा तितक्याच प्रमाणात जाणवते. जीमला जाणं आणि डाएट करणं प्रत्येकवेळा शक्य नसल्यामुले महिलाचं वजन दिवसेंदिवस वाढत जातं. जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी डाएट करणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी काही सोपे व्यायाम करून आपलं वजन कमी करून हवी तशी फिगर मिळवू शकता. अनेकदा व्यायाम करून सुद्धा हवीतशी शरीरयष्टी आपल्याला मिळत नाही. कारण आपण व्यायाम करत असताना अनेक चुका करत असतो. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी करता येईल अशा व्यायाम प्रकाराबद्दल सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही झटपट बारीक होऊ शकता.
बेंच डिप्स ट्राइसेप्स ही तुमच्या छातीसाठी आणि खांद्यासाठी बेस्ट व्यायाम आहे. कमरेच्या खालच्या भागात जमा झालेले फॅट कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार केला जातो. यामुळे तुमची स्ट्रेथ वाढण्यास मदत होते. हा व्यायाम प्रकार करणं कठीण आहे पण तुम्ही बेंचचा वापर करून तुम्ही हा व्यायाम प्रकार करू शकता.यामुळे तुमचे खांदे आणि छाती मजबूत होईल तसचं बोन डेन्सिटी वाढण्यास मदत होईल. शरीराला होत असलेल्या जखमांपासून वाचण्यासाठी तुम्ही हा व्यायाम करू शकता. ( हे पण वाचा-पोटाचा आणि कमरेचा आकार वाढलाय? घरच्याघरी योगासनं करून मिळवा परफेक्ट फिगर)
हा व्यायाम करण्यासाठी बेंचचा वापर करून तुम्हाला डीप्स मारायचे आहेत. त्यासाठी आपले दोन्ही हात पंज्याच्या मधोमध ठेवून बेंचवर ठेवा. नंतर गु़डघ्यांना वाकवत खांद्यावर जोर देत संपूर्ण शरीराला खाली ढकला. यामध्ये तुम्ही दोन्ही पायांच्यामध्ये टेबल सुद्धा ठेवू शकता. हा व्यायाम प्रकार तुम्ही जीम पार्क किंवा घरच्याघरी सुद्धा करू शकता. आपल्या क्षमतेनूसार तुम्ही २० रिपिटेशन मारून हा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. दररोज व्यायाम करत असताना रिपिटेशन्स वाढवत जा. ( हे पण वाचा- व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध!)
यामुळे डोक्यात एंडोर्फिनचं प्रमाण वाढतं. जे तुम्हाला उर्जा देण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. मानसीक विकास करून ताण- तणाव कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार उपयुक्त ठरत असतो. बेंच डीप्समुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता भरून निघते आणि हाडांना पोषण मिळत असतं. हा व्यायाम करताना जर तुम्हाला खाद्यांमध्ये वेदना झाल्या तर घाबरण्याचं काही कारण नाही. रोज सराव केल्यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते.