शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

रात्री सॉक्स घालून झोपल्याने मिळतात अनेक फायदे, पण एक चूक पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 10:56 AM

Sleeping With Socks On : काही लोकांचं मत आहे की, याने शरीराचं तापमान जास्त वाढतं आणि झोपेत अडथळा निर्माण होण्याचा धोका असतो. पण मुळात सॉक्स शरीराच्या आतील तापमान रेगुलेट करण्याचं काम करतात.

Sleeping With Socks On : झोप आयुष्याचा महत्वाचा भाग असते. तुमच्या तुमच्या दिवसातून जवळपास एक तृतीयांश भाग झोपण्यात घालवता. मेंदू आणि शरीराच्या कार्यासाठी झोप फार महत्वाची असते. पण जास्तीत जास्त लोकांना वेळेवर झोपण्यात समस्या येते. ही समस्या दूर करण्यासाठी आहारात बदल, व्यायाम आणि मालिश करण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्ही कधी सॉक्स घालून झोपले आहात का? जर असं केलं नसेल तर करून बघा.तसे तर अनेक लोक हिवाळ्यात उष्णतेसाठी अनेक लोक सॉक्स घालून झोपतात. पण काही लोकांचं मत आहे की, याने शरीराचं तापमान जास्त वाढतं आणि झोपेत अडथळा निर्माण होण्याचा धोका असतो. पण मुळात सॉक्स शरीराच्या आतील तापमान रेगुलेट करण्याचं काम करतात.

NCBI मध्ये प्रकाशित एका स्टडीनुसार, जे वयस्क लोक सॉक्स घालून झोपतात त्यांना झोप न येण्याची समस्या होत नाही. सोबतच ते तुलनात्मक रूपाने लवकर झोपतात. सॉक्स घालून झोपण्याच्या अनेक फायद्यांबाबत आणि नुकसानाबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं

क्लीवलॅंड क्लीनिकनुसार, सॉक्स घालून झोपल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढतं. आणि जेव्हा यात सुधारणा होते तेव्हा शरीराला फायदा मिळतो. ज्यामुळे हृदय, फुप्फुसं आणि मांसपेशी मजबूत होतात.

झोप लवकर येते

सॉक्स घालून झोपणं डिस्टल वासोडिलेशनच्या प्रक्रियेसाठी फायदेशीर असतं. ही ती जागा आहे जिथे रक्तप्रवाह हात आणि पायांमध्ये वाढतो. सोबतच कोर तापमान कमी करतं आणि तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत मिळते.

मेनोपॉज हॉट फ्लॅशेसमध्ये आराम

रात्रीच्या वेळी मेनोपॉज हॉट फ्लॅशेस शरीराचं तापमान वाढवण्याचं काम करतं. अशात तुम्ही विचार करता की, सॉक्स घालून झोपल्याने तापमान आणखी वाढेल. पण होतं याच्या उलट. कारण गरम पाय ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा करतात. ज्याने शरीराचं तापमान स्थिर होतं आणि मेनोपॉज हॉट फ्लॅशेस कमी करण्यासही मदत मिळते.

टाचांच्या भेगा दूर होतात

जर तुम्हाला टाचांना भेगा असतील तर याचं कारण सतत थंड, शुष्क हवेच्या संपर्कात राहिल्याने होतं. ज्यामुळे तुमची त्वचा शुष्क होते. अशात ही समस्या दूर करण्यासाठी पायांना मॉइश्चराइज करून सॉक्स घाला. याने भेगा दूर होण्यास मदत मिळते. 

या चुका कराल तर मिळणार नाही फायदे

सॉक्स घालून झोपल्याने ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधारणा होते.  जर तुम्ही घालत असलेले सॉक्स फार जास्त टाइट किंवा जाड असतील तर याने ब्लड फ्लोमध्ये कमतरता येऊ शकते. त्यासोबतच सॉक्स नियमितपणे धुण्याचीही गरज असते. रात्री सॉक्स घालणार असाल तर ते स्वच्छ असले पाहिजे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी