ऐरवी आपण तिळ आणि तिळापासून तयार झालेले पदार्थ खूप कमी प्रमाणात खात असतो. पण मकरसक्रांतीला तीळाचे लाडू मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. कारण प्रत्येकजण लाडू खाताना आपला आनंद साजरा करत असतो. तुम्ही सुद्धा जर तिळाचे लाडू मनसोक्त खाण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. कारण खाल्यानंतर समस्या उद्भवण्यापेक्षा तुम्हाला आधी कल्पना असल्यास तुमचं आरोग्य चांगलं राहील.
तिळात असलेले फायबर आणि मॅग्नेशियम असतं. हे घटक इंन्सुलीन आणि ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करत असतात. त्याचसोबत रक्तदाब कमी करण्यासाठी सुध्दा तिळ खूप फायदेशीर ठरत असतात. अनेक अभ्यासातुन हे स्पष्ट झाले आहे की तिळाचा समावेश आहारात केल्यास रक्तदाबाशी निगडीत असलेल्या समस्या दूर होतात.
दातांसाठी फायदेशीर
तिळाच्या सेवनाने दातांना मजबूती मिळतं असते. प्लाक्सच्या समस्यांना दूर ठेवण्याचे काम याद्वारे होत असते. यासोबतच तोडातून येणारा दुर्गंध, हिरड्यांमधून येत असलेले रक्त आणि दात खराब होण्याची समस्या दूर करण्यासाठी तिळ फायदेशीर ठरत असतात.
पचनक्रिया सुधारते
पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी तीळ उपयुक्त असतात. तिळ खाल्ल्याने खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होऊन पोट साफ होते. त्यामुळे कॉन्स्टिपेशनची समस्या दूर होते.
त्वचेसाठी आणि केसांसाठी उपयुक्त
आपल्या त्वचेचे सौदर्य टिकवून ठेवण्यासाठी तीळ हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. याचे ऐंटी-बैक्टीरियल आणि एंटी-ऑक्सिडेंट गुण त्वचेवर पिंपल्स आणि डार्क स्पॉट येण्यापासून थांबवत असतात. तिळाचे तेल केसांना लावल्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात. त्याचजोडीला केसांची चमक सुद्धा वाढते. केसांमध्ये कोंडा असेल किंवा केस गळण्याची समस्या येत असेल तर तिळाचा वापर गुणकारक ठरत असतो.
तिळाच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम
तिळाचे फायदे आहेत तसंच तोटे सुद्धा आहेत. तिळाचं सेवन जास्त केल्यामुसळे त्वचेवर एलर्जी येण्याचा सुध्दा धोका असतो. अनेक जणांना तिळ सुट होत नसल्यामुळे त्यांच्या त्वचेवर रिएक्शन येण्याची शक्यता असते. जर तुम्ही जास्त तिळ खाल्ले तर डायरीयाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. काहीवेळा तिळाच्या अतिसेवनाने रक्तदाब कमी सुद्धा होऊ शकतो. ( हे पण वाचा:Til Ladu Recipe : मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे लाडू, एकदा खाल खातच रहाल...)