आजकाल प्रत्येकाच्या घरात वेगवेगळ्या समस्यांसाठी गोळ्या असतात. तर कोणी घरगुती, आयुर्वेदिक उपाय करताना दिसून येतं. घरगुती उपायांसाठी तुम्हाला फारसे परिश्रम घ्यावे लागत नाहीत. तसंच जास्तीचा खर्चसुद्धा होत नाही. आज आम्ही तुम्हाला पूजेच्या सामानात हमखास उपलब्ध असणाऱ्या बेलपत्राचे फायदे सांगणार आहोत. शंकराच्या पुजेसाठी बेलाचा वापर सर्वत्र केला जातो. बेल शंकराला प्रिय असल्यानं सोमवारी किंवा महाशिवरात्र अशा सण उत्सवांच्या दिवशी बाजारात बेलच बेल पाहायला मिळतात.
वेबएमडी(WEBMD) च्या रिपोर्टनुसार बेलाचं शास्त्रीय नाव एजेल मार्मलोस (Aegle Marmelos) आहे. बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि पौष्टिक तत्व असतात. प्रथिनं आणि खनिजांचा साठा यात असतो. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, रायबोफ्लोबीन, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी1, बी6, बी 12 यात मोठ्या प्रमाणात असतात. आयुर्वेदानुसार, मानवी शरीरात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष असतात. यापैकी कोणत्याही एका दोषाचं शरीरातलं प्रमाण असंतुलित झालं की काही विकार निर्माण होतात. या दोषांचे नियंत्रण करण्यासाठी बेलपान गुणकारी ठरते.
फायदे
डायबिटीस , ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रोल (Cholesterol) आणि हृदयाशी संबधित आजार दूर करण्यात बेलपान अत्यंत फायदेशीर ठरते. ज्या लोकांना अपचन, पोट साफ न होण्याचा त्रास होतो त्यांच्यासाठी बेल गुणकारी आहे. पोट साफ करण्यासाठी बेल अत्यंत गुणकारी आहे. यामधील लक्सेटीव्ह गुणधर्म असल्यामुळे पचन संस्था अत्यंत व्यवस्थित राहते.
सावधान! टॉयलेटमध्ये तुम्हीही रोज हीच चूक करत असाल तर आरोग्याचं होऊ शकतं मोठं नुकसान, जाणून घ्या कसं
बेलपानात मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडेंटस असतात. याचा लेप चेहऱ्यावर लावल्यास त्वचा तुकतुकीत होते. चेहऱ्यावर डाग असतील, घामामुळे दुर्गंध येत असेल तर बेलपानाचा फेसपॅक या सर्व समस्या दूर करण्यास मदत करतो. बेलपानाचा ज्यूस प्यायल्यास किंवा याची पाने खाल्ल्यास केस गळण्याची समस्याही दूर होते याशिवाय केस चमकदा आणि दाट होतात.
अरे व्वा! गुडघ्यांवरील शस्त्रक्रिया कमी वेदनादायी होण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित
खासकरून उन्हाळ्यात बेलाच्या फळाचे सरबत प्यायल्यास शरीराचे तापमान अगदी नियंत्रित राहतं. बेलफळातील गर काढून त्यात दोन ग्लास पाणी घालावे, एक लिंबू, चार-पाच पुदिन्याची पानं आणि चवीनुसार साखर घालून सरबत बनवा. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यास उष्णतेनं होणाऱ्या आजारांपासून सुटका होईल. सध्या महाशिवरात्र येत असल्यामुळे बाजारात तुम्हाला मोठ्या प्रमाणात बेल उपलब्ध होतील.