(Image Credit : YouTube)
सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये फिट आणि हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळ्या ज्यूसचं सेवन केलं जातं. पण यात सर्वात जास्त फायदेशीर ठरतं ते दूध. दुधाचे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहीत आहेतच. दुधाच्या सेवनाने केवळ लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही फायदे होतात. दुधात आणखी काही मिश्रित करून सेवन केल्यास फायदे अधिक जास्त होतात. असाच एक पदार्थ म्हणजे दालचिनी जर दुधात मिश्रित करून सेवन केल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. कारण दालचिनीमध्येही आरोग्यासाठी फायदेशीर अनेक गुण असतात.
दुध हे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर मानलं जातं. आणि जेव्हा दालचिनीसारख्य आयुर्वेदिक औषधासोबत हे सेवन केलं जातं तेव्हा याचे फायदे दुप्पट होतात. दालचीनीचं पावडर दुधात मिश्रित केल्यावर दुधाचे अॅंटी-बॅक्टेरिअल गुण वाढतात. याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू लागते. त्यामुळे डायबिटीज, जाडेपणा आणि इम्यून सिस्टीम करण्यात या दुधासारखा दुसरा पर्याय नाहीये. दालचिनी घालतेलं दूध तयार करण्यासाठी आधी दूध गरम करा. त्यात दालचीनीचा थोडासा तुकडा टाका. दुधाला चांगली उकडी येऊ द्या. हवं असेल तर तुम्ही गोडव्यासाठी यात एक चमचा मधही टाकू शकता.
दालचिनी घातलेल्या दुधाचे फायदे
हाडांमध्ये होणाऱ्या वेदना आणि कमजोरी दूर करण्यासाठी दुधात एक चमचा दालचीनी चूर्ण आणि एक चमचा मध टाकून रोज सेवन करावं. कॅन्सरसारख्या घातक आणि जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठीही दालचिनी घातलेल्या दुधाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
दालचिनी घातलेलं दुधामध्ये कॅन्सरशी लढणारे गुण असतात. तसेच या दुधामुळे घशाच्या वेगवेगळ्या समस्या जसे की, घसा दुखणे, घसा खवखवणे या समस्याही दूर होतात. इतकेच नाही तर या दुधाचे तुमच्या त्वचेला आणि केसांनाही अनेक फायदे होतात. त्वचा आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या या दुधाने दूर होतात.
टाइप २ डायबिटीजसाठी फायदेशीर दूध
टाइप २ डायबिटीजने हैराण असलेल्या रुग्णांनी जर दालचिनी घातलेलं दूध सेवन केलं तर अनेक फायदे होतात दालचिनी घातलेल्या दुधाच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. याचा फायदा डायबिटीजचा आजार कमी करण्यासाठी होतो. खासकरून रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप दालचिनी मिश्रित केलेलं दूध सेवन करा. याने तुम्हाला फार चांगली झोप लागेल. याने तुमची झोप न येण्याची समस्याही दूर होईल.