शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

अनेक गंभीर आजारांवर रामबाण, तुम्हाला माहितही नसतील इतके आहेत जिऱ्याचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 12:18 PM

जिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मांचा साठा आहे, ज्यामुळे आपल्या आरोग्यास उपयुक्त पोषक घटकांचा पुरवठा होतो. महत्त्वाचे म्हणजे वजन घटवण्यासाठी जिरे अतिशय प्रभावी उपाय आहे.

प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाकघरामध्ये सहजरित्या आढळणारी सामग्री म्हणजे जिरे. स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी या गरम मसाल्याचा आवर्जून उपयोग केला जातोच. जिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मांचा साठा आहे, ज्यामुळे आपल्या आरोग्यास उपयुक्त पोषक घटकांचा पुरवठा होतो. महत्त्वाचे म्हणजे वजन घटवण्यासाठी जिरे अतिशय प्रभावी उपाय आहे. डॉ. मनीष सिंह यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबसाईटला जिऱ्याचे फायदे सांगितले आहे.

वजन घटवण्यास मदत करतेशरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी उपयुक्त असलेल्या घटकांचा जिऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. आयुर्वेदानुसार आहारामध्ये जिऱ्याचा नियमित समावेश करणं लाभदायक असते. यातील औषधी घटकांमुळे पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहते, ज्यामुळे वजन सहजरित्या कमी होते. नियमित जिऱ्याचे सेवन केल्यास वाढत्या वजनाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.आहारामध्ये जिऱ्याचा समावेश करण्याव्यतिरिक्त बहुतांश जण नियमित स्वरुपात जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करतात. जिरे पाण्यात भिजवल्यास ऑस्मोसिस नावाची एक नैसर्गिक प्रक्रिया होते. या प्रक्रियेमध्ये जिऱ्यातील सर्व पोषक घटक पाण्यामध्ये मिक्स होतात. ज्यामुळे पाण्याला फिकट पिवळा रंग येतो. जिऱ्याचे हे पाणी प्यायल्यास वजन वाढत नाही.

पोटाच्या समस्यांवर आरामजिऱ्यामध्ये आढळणाऱ्या पोषक तत्त्व आणि अँटी ऑक्सीडंट पचनक्षमता वाढवतात. जिरं आपल्या प्रतिकारशक्तीलाही वाढवतं. त्यामुळे पोटासंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात. जिऱ्याच्या सेवनाने जेवण लवकर आणि चांगलं पचत. आवळ्यासोबत जिरं, ओवा आणि काळं मीठ मिसळून खाल्ल्यास भूक वाढते.

मुरुमं अन् त्वचेच्या समस्या दूर होतातजिरं हे ब्यूटी बूस्टर म्हणून ओळखलं जातं. जिऱ्यामध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमीन्स आढळतात. जे त्वचेच्या व्हिटॅमीन ई च्या गरजेला पूर्ण करतात. जिऱ्यामध्ये आढळणाऱ्या व्हिटॅमीन ई मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्ही जिऱ्याचं पाणी रोज घेतल्यास तुमच्या चेहऱ्यावर तेज येतं आमि चेहऱ्यावरील अॅक्नेची समस्या दूर होईल. जिऱ्यामध्ये अँटी फंगल गुणही असतात ज्यामुळे त्वचेचं कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शन (Skin Infections) पासूनही रक्षण होतं.

सर्दीच्या समस्येपासून मुक्तताथंडीच्या दिवसात नाक बंद होण्याची समस्या खूप कॉमन आहे. पण काहीजणांना हा त्रास बरेच दिवस होतो. या त्रासापासून सुटका होण्यासाठी जिऱ्याचा वापर करायला विसरू नका. जिरं चांगल भाजून घ्या आणि त्याची एक पोटली बनवून घ्या. मग ते थोड्या थोड्या वेळाने हुंगत राहा. असं केल्याने शिंका येणं बंद होईल. तसंच जिरं हे बद्धकोष्ठ दूर करण्यात ही मदत करतं. बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी एक ग्लास ताकात काळ मीठं आणि भाजलेलं जिरं घालून प्या. असं केल्याने लवकर बरं वाटेल. 

अशक्तपणा कमी होतोपामुळे जेव्हा शरीर दूखू लागतं. तेव्हाच आपल्याला अशक्तपणाही जाणवू लागतो. अशावेळी जिऱ्यासोबत गूळ मिक्स करून गोळी बनवा आणि कमीत कमी दोन ते तीन वेळा खा. ताप कमी होईल. तसंच तुम्ही ताप आल्यावर जिऱ्याचं पाणी ही घेऊ शकता. जिऱ्यातील थंडावा अंगातील उष्णतेला त्वरित कमी करतो आणि ताप उतरतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स