(Image Credit : teamajesty.com)
सामान्यपणे असा सल्ला दिला जातो की, झोपण्यापूर्वी चहा पिऊ नये. कारण याने शरीराचं नुकसानही होतं आणि झोपही उडते. पण जेव्हा विषय ग्रीन टी चा येतो, तेव्हा हे उलटं होतं. ग्रीन टी ने शरीराला अनेक प्रकारचा फायदा होतो. खासकरून तेव्हा जेव्हा झोपण्याच्या काही वेळेआधी तुम्ही ग्रीन टी घेता.
चांगली झोप
ग्रीन टी मध्ये L-theanine नावाचं अमीनो अॅसिड असतं. याने एग्झायटी कमी होते आणि डोकं शांत राहतं. याचाच परिणाम म्हणजे तुम्हाला झोप चांगली येते.
हेल्दी आणि ग्लोइंग स्किन
झोपण्याच्या एक तासापूर्वी ग्रीन टी सेवन केल्याने स्किनला फायदा होतो. रात्री स्किन रिलॅक्ड असते, ज्याने ग्रीन टी ला शरीर चांगल्या प्रकारे टॉक्सिन फ्री करण्यास मदत मिळते. याने त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग होते.
वजन कमी करण्यास मदत
इंटरमिटेंट फास्टिंगबाबत तर तुम्ही ऐकलं असेलच की, याने वजन कमी करण्यास कशी मदत होते. सोबतच जर तुम्ही झोपण्यापूर्वी ग्रीन टी चं सेवन कराल तुमची वेट लॉस प्रोसेस आणखी वेगाने काम करेल.
कोलेस्ट्रॉल
झोपेतून उठल्यावर शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि शुगरचं प्रमाण काही वेळासाठी नॅच्युरली हाय होतं. हे प्रमाण वाढणं आरोग्यासठी नुकसानकारक ठरू शकतं. यासाठी रात्री ग्रीन टी सेवन करणं सुरू करा. ग्रीन टी मुळे या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
इम्यून सिस्टीम स्ट्रॉंग करणं
झोपताना शरीर रिलॅक्स असतं आणि याच काळात शरीराचा स्ट्रेस कमी केला जातो. ग्रीन टीमुळे यात मदत मिळते. चांगल्या झोपेमुळे इम्यून सिस्टीम मजबूत होतं. अशात ग्रीन टी अधिक फायदेशीर ठरते. याने चांगली झोप तर येतेच सोबतच यातील अॅटी-ऑक्सिडेंट तत्वामुळे शरीराचं इम्यून सिस्टीमही मजबूत होतं.