कोरोनाकाळात आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय काय करतो. किती परदेशी वेबसाईट्स, युट्युब चॅनल पाहतो. पण आपल्याकडे सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका सहज मिळणाऱ्या भाजीबद्दल सांगणार आहोत जी सर्वच घरात खाल्ली जाते. पण तिचे काय फायदे आहेत हे तुम्हाला माहित नसेल. मुख्य म्हणजे ही भाजी कोरोना काळात वरदान आहे.
शेवग्याच्या शेंगा तुम्ही खात असालंच. शेवग्याच्या पानांची भाजी तर गोकुळाष्टमीला आवर्जून खाल्ली जाते. शेवग्याची कढी तर अप्रितम होते. शेवग्याच्या शेंगा चोखत खाण्याची जी मज्जा आहे ती अवर्णणीय. पण हे शेगव्याच्या भाजीचं पुराण फक्त चवीपुरतंच मर्यादित नाही बरं का. शेवग्याचे असे काही फायदे आहेत जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील. त्यातही कोरोनाकाळातील रोगप्रतिकाराक शक्तीसाठी शेवग्याचा खुराक हवाच.
रोगप्रतिकारक शक्ती वाढतेकोरोनाकाळात रोगप्रतिकारक शक्ती (Immunity)सी व्हिटॅमिनयुक्त पदार्थ खाण्याकडे सर्वांचा ओढा असतो. शेवग्याच्या शेंगामध्ये सी व्हिटॅमिन म्हणजेच क जीवनसत्व मोठ्याप्रमाणावर असते. तसेच यामध्ये पोटॅशियम, आयरन, मॅग्नीशियम, कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन, कॅल्शियम, व्हीटॅमिन-ए आणि बी अशी पोषकतत्वे असतात. या सर्वांचा उपयोग कोरोनाकाळात इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यामध्ये होतो. यामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळेही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
मुतखड्याचा त्रास दूर होतो
शेवग्याचे सुप प्यायल्यामुळे तसेच भाजी खाल्ल्यामुळे मुतखड्याच्या त्रासापासून आराम मिळतो. त्यामुळे मुतखडा बाहेर शरीराच्या बाहेर पडतो असा दावा केला जातो.
केस मजबूत होतात
शेवग्याच्या फुलांचा उपयोग केस चमकदार व मजबूत करण्यासाठी केला जातो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शेवग्याच्या फुलांचा चहा केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे.
डोकेदुखीचा त्रास कमी होतो
तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर शेवग्याची भाजी आवर्जून खा. यामुळे डोकेदुखीची समस्या चटकन दूर होईल.
सुज कमी होते जखमा लवकर भरतात
शेवग्याच्या सेवनामुळे कोणत्याही अवयवावर आलेली सूज कमी होते. तसेच याच्या पाल्याचे वाटण जखमांवर लावल्यास जखमा लवकर भरून निघतात.
(टिप - वरील माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून कोणताही दावा केलेला नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)