आपण दैनंदिन आयुष्य जगत असतान अनेक अनहेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करत असतो. तसंच आपली जीवनशैली अनियमीत असते. त्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यात मानसीक आजार, लठ्ठपणा यांचा समावेश होतो. या आजारांपासून जर तुम्हाला लांब राहायचं असेल तर काही पदार्थांचे सेवन करणं गरचेचं आहे.
गुळवेल या वनस्पतीचं सेवन जर तुम्ही केलं तर वेगवेगळया आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. गुळवेलाला गिलोय असं सुद्धा म्हणतात. गिलोयमध्ये अनेक एन्टिऑक्सीडंट्स आणि एन्टीबॅक्टेरीअल गुण असतात. स्फोरस, कॉपर, कॅल्शियम, जिंक आणि मॅग्निशियम आणि मिनरल्स असतात. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत. गुळवेलाचे शरीरासाठी असलेले फायदे.
जीवघेण्या रोगांपासून वाचवण्यासाठी
डेंग्यूसाठी गिलोय सगळ्यात जास्त फायदेशीर असतो. कारण या आजारात प्लेटलेट्स मोठ्या संख्येने कमी होतात. त्यामुळे तुमचा जीव सुद्धा जाण्याची शक्यता असते. जर तुम्ही गुळवेलाच्या रसाचे सेवन केलं तर डेंग्यु होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यात येतो. रक्तात साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी गिलोय फायदेशीर असतं. त्यामुळे डायबिटिस होण्यापासून रोखता येईल.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
गुळवेल तुमच्या शरीरातील प्रतिकारक क्षमता वाढवते. ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला किंवा दुसऱ्या आजारांपासून संरक्षण मिळते. यातील हर्ब्स तुमच्या शरीराला स्वच्छ करतात. तसंच शरीराच्या इतर भागातील हानिकारक तत्वसुध्दा दूर शरीराबाहेर टाकण्यात मदत करते.
पोटाचे विकार दूर होतात
गुळवेलांमध्ये पचनाचे विकार आणि ताण-तणाव दूर करणारे गुण आहेत. ज्यामुळे बध्दकोष्ठ, गॅस आणि इतर समस्या दूर होतात. गुळवेलाच्या सेवनाने भूकही वाढते. ह्यामुळे तुमच्या जीवनातील मानसिक तणाव दूर होऊन तुमचे जीवन आनंददायी होईल.
गुळवेलाचा असा करा वापर
गुळवेल आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. काढा करण्यासाठी १ कप गुळवेल घेतल्यास त्याच्या दोन ग्लास पाणी घालावे. हे मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे. ( हे पण वाचा- जिमला जाऊन 'या' चुका कराल तर बॉडी बनणार नाही पण बोंबलत बसाल....)
गुळवेलाच्या सेवनाआधी ही काळजी घ्या
तुम्ही आधीपासून घेत मधुमेहाची औषध घेत असाल तर गुळवेलाचे सेवन करू नका.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी शक्यतो गुळवेलाचे सेवन करू नये.
कोणतीही शस्त्रक्रिया झाल्यावरही गुळवेलाचा वापर टाळावा. अतिशय गुणकारी असलेल्या गुळवेलाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
( हे पण वाचा- शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी रिकाम्यापोटी 'असं' करा दह्याचं सेवन....)