हिवाळा सुरू झाला आहे. या हंगामाच एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जास्त भाज्या खायला मिळतात. नेहमीपेक्षा स्वस्त आणि ताजे मटार बाजारात दिसतात. त्यामुळे आपण फ्रोजन मटार खाण्यपेक्षा ताजे मटार स्वयंपाक करताना वापरु शकतो. चला तर जाणून घेऊया हिरवे मटार खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे काय आहेत.
मटारचे त्वचेच्या सौंदर्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. मटारची पेस्ट करून तिचा वापर स्क्रब सारखाही करतात, यामुळे त्वचा उजळते. हिरवा मटार खाल्याने स्मरणशक्ती वाढते. याशिवाय तणाव, डिप्रेशन यांसारख्या समस्यांपासून बचाव होतो. शक्य असल्यास तुम्ही स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता. किंवा भाजी करून आणि उकडून सुद्धा खाऊ शकता.
पोट साफ होत नसल्यास मटार खूप फायदेशीर आहे. हिरव्या वाटाण्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा 3 फॅट सांधेदुखी संबंधित समस्यांमध्ये फायदेशीर ठरतात. मटारमध्ये असलेलं प्रोटीन हाडांच्या मजबुतीसाठी मदत करतं. ताज्या हिरव्या वाटाण्यामध्ये अँटी-ऑक्सीडंट आणि रोगप्रतिकारक गुणधर्म असतात. यात शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक घटक देखील असतात.यात फायबर, फ्लेव्होनॉइड्स, स्टार्च आणि प्रथिने देखील असतात. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी मटारचे सूप प्यायल्यास रक्तदाबाचा त्रास कमी होतो.
हिरव्या मटारमध्ये असे गुण आहेत जे शरीरातील कोलेस्ट्रॉल लेव्हलला वाढू देत नाही. मटारच्या सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉल संतुलित राहतो. हिरव्या मटारमध्ये लोह, झिंक, मॅगनीज, कॉपर ही पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. ही सर्व तत्त्वे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासोबतच यात अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतं, ज्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली जाते. याने शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून लढण्यास मदत मिळते.
हृदयरोगांनी ग्रस्त लोकांसाठी मटारचं सेवन फायदेशीर ठरतं. कारण याने हृदयासंबंधी वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करु शकतो. मटारमध्ये सूज कमी करणारे अँटी-ऑक्सिडेंट गुण असतात. याने हृदय निरोगी राहतं. मटारमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे केसगळती रोखली जाऊ शकते. तसेच केस मुलायम आणि मजबूत होण्यासही मदत मिळते. त्यासोबतच यात असलेल्या व्हिटॅमिन बी ६, बी १२ आणि फॉलिक अॅसिड लाल रक्तपेशी तयार करण्यास फायदेशीर ठरतात. यामुळे केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर होतात.