हिंग हा भारतीयांच्या स्वयंपाकघरातील एक मसाल्याचा पदार्थ आहे. हा तिखट वासाचा मसाला (Asafoetida Benefits) फेरुला वनस्पतींमधून काढलेल्या लेटेकपासून बनवला जातो. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी डाळ आणि शाकाहारी पाककृतींमध्ये हिंग वापरले जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का? हिंगाचा वापर अनेक आजारांवर पारंपारिक उपाय म्हणूनही केला जातो. जाणून घेऊया हिंगाच्या (Hing Medicinal Use) औषधीय गुणधर्मांबद्दल...
अपचनासाठी उपायशतकानुशतके हिंगाचा उपयोग पोटातील गॅस, पॉट फुगणे, आणि पेटके यावर उपाय (Remedy For Indigestion) म्हणून केला जातो. त्याचे कार्मिनिटिव्ह आणि अँटिस्पास्मोडिक गुणधर्म जास्त अॅसिड स्रावामुळे पोट फुगणे आणि पोटदुखीपासून आराम देतात. स्वयंपाक केल्यानंतर त्याची तीव्र चव आपल्या लाळेतील स्राव वाढवून भूक उत्तेजित करते आणि पचनास मदत करते. हिंगदेखील पित्त आणि इतर एन्झाईम्सचा स्राव वाढवते ज्यामुळे अन्नाचे विघटन होते.
अँटिमायक्रोबियल अॅक्टिव्हिटीहिंगामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल गुणधर्म असल्याचा (Hing Inhibit Antimicrobial Activity) पुरावा अभ्यासात आढळून आला आहे. हिंगाचा क्रूड अर्क इसरशिया कोलाय (Escherichia Coli) आणि स्टॅफिलोकॉकस ओरियस (Staphylococcus Aureus) यांची वाढ प्रतिबंधित करते. हे बॅक्टेरिया अतिसार, न्यूमोनिया, मूत्रमार्गात संक्रमण, अन्न विषबाधा, विविध त्वचा रोग, हाडे आणि सांधे यांचे संक्रमण आणि सेप्सिसचे कारण बनतात.
मूत्रपिंड संरक्षणविस्टार उंदरांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की हिंगाचा अर्क लघवीचे प्रमाण वाढवून मूत्रपिंडाचे (Kidney Protection) कार्य सुधारते. हिंगामध्ये असलेले फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्स लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणून कार्य करतात, ज्यामुळे अतिरिक्त क्रिएटिनिन आणि युरिया बाहेर काढण्यात मदत होते. असे परिणाम सूचित करतात की हिंगाच्या सेवनाने मानवांच्या मूत्रपिंडांना देखील फायदा होऊ शकतो.
कर्करोग विरोधीसंशोधनात असे दिसून आले आहे की उंदरांमधील ट्यूमर कमी करण्यासाठी हिंग प्रभावी (Hing Is Anti-Cancer) आहे. फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड आणि स्तनांमध्ये कर्करोगाचा प्रसार कमी करण्यासाठी हिंग प्रभावी असू शकते आणि कर्करोगामुळे कमी झालेल्या शरीराचे वजन वाढविण्यात मदत करते.
महिलांशी आजारांवर उपचारमासिक पाळीच्या समस्या, प्रसूतीविषयक गुंतागुंत, अवांछित गर्भपात आणि वंध्यत्व यासारख्या स्त्रियांच्या आरोग्याच्या समस्यांवर पारंपरिक उपाय (Hing For Women Health Problems) म्हणून हिंगाचा वापर केला जातो. बाळंतपण झाल्यानंतरदेखील स्त्रियांना हिंग दिले जाते. जे सामान्यतः बाळंतपणानंतर उद्भवणारे पाचक विकार कमी करतात.