Benefits of Bathing in The Evening : उन्हाळा सुरू झाला की, अंगाची लाही लाही होते. उन्हाळ्यात वेगवेगळे आजारही डोकं वर काढतात. अशात उन्हाळ्यात आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळी काळजी घ्यावी लागते. अशात उन्हाळ्यात सायंकाळी थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला अनेकजण देतात. दिवसभर येणारा घाम आणि घामाची दुर्गंधी हैराण करून सोडते. अशात सायंकाळी किंवा रात्री आंघोळ केली तर अनेक फायदे होतात. चला जाणून घेऊ ते फायदे....
१) इम्यूनिटी वाढते - या दिवसात अधिक उष्णतेमुळे अनेक गंभीर आजार होण्याचाही धोका असतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते. पण रोज रात्री जर आंघोळ कराल तर तुमची इम्यूनिटी वाढू शकते. याने तुमची वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची क्षमता वाढते.
२) झोप चांगली येते - उन्हाळ्यात उष्णतेमुळे इतर दिवसांपेक्षा अधिक थकवा आणि तणाव जाणवतो. त्यामुळे आरोग्य धोक्यात येतं. शरीरातील वेगवेगळ्या प्रक्रिया बदलून जातात. त्यात झोपेचीही समस्या मुख्य आहे. एकतर गरमीमुळे आणि दुसरं म्हणजे शरीरातील उष्णतेमुळे लवकर झोप येत नाही. पण रात्री आंघोळ कराल तर तुम्हाला बेडवर पडल्या पडल्या चांगली झोप लागेल.
३) फ्रेश वाटेल - उन्हाळ्याच्या दिवसात धुळ, माती आणि घामामुळे तुम्ही हैराण झालेले असतात. घामामुळे चिकटपणा येतो आणि शरीर खायवायला लागतं. तसेच केसांमध्ये घामामुळे समस्या होते. अशात जर तुम्ही रोज रात्री घरी जाऊन आंघोळ केली तर शरीरावर साचलेली धुळ-माती निघून जाते आणि घामामुळे आलेला चिकटपणाही दूर होतो. त्यामुळे आंघोळ केल्यावर तुम्हाला फ्रेश आणि ताजंतवाणं वाटू लागतं. त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये साचलेली धुळ निघून जाते आणि त्वचेवर ग्लो दिसतो.
४) हृदय राहतं निरोगी - रात्रीच्यावेळी शरीरात ब्लड सर्कुलेशन धीम्या गतीने होतं, त्यामुळे तुम्ही जर रात्रीच्यावेळी थंड पाण्यान आंघोळ कराल तर शरीरातील ब्लड सर्कुलेशन चांगलं होतं. अर्थातच याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. हृदय नेहमी निरोगी ठेवण्यासाठी रोज रात्री आंघोळ करण्याची सवय लावून घ्या.