शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

Summer health tips: उन्हाळ्यात प्या थंडगार ताक अन् ठेवा 'हे' आजार दूर, वजन तर झटपट कमी होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 3:57 PM

ताज्या दह्यापासून बनवलेले ताक विशेषत: उन्हाळ्याच्या (Summer) दिवसात अधिक फायदेशीर मानलं जातं.

ताक (buttermilk) नियमित प्यायल्यानं शरीराला अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं. दह्यापासून ताक बनवले जाते. दही मंथनातून तूप काढल्यावर जो द्रव राहतो त्याला आपण ताक म्हणतो. ताज्या दह्यापासून बनवलेले ताक विशेषत: उन्हाळ्याच्या (Summer) दिवसात अधिक फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे पोट जड होणं, अस्वस्थता, भूक न लागणं, अपचन, पोटाची जळजळ इत्यादी त्रास कमी होतात. अन्न पचत नसेल तर भाजलेले जिरे, काळी मिरी पावडर आणि खडे मीठ ताकात मिसळून घेतल्याने जेवण लगेच (Benefits of drinking buttermilk) पचते.

ताकमधील घटकताकामध्ये आढळणाऱ्या घटकांबद्दल सांगायचे झाल्यास ताकामध्ये अ, ब, क, ई आणि के जीवनसत्त्वे असतात. उन्हाळ्यात याचे सेवन केल्यानं आपल्या शरीराला पुरेसे पोषक तत्व मिळतात.

पाण्याची कमतरता भासत नाहीताक प्यायल्यानं शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. उन्हाळ्यात भरपूर घाम येतो त्यामुळे डिहायड्रेशनची होऊ शकतं. म्हणूनच डॉक्टरसुद्धा उन्हाळ्यात विशेषतः ताक पिण्याचा सल्ला देतात. त्यातून पाण्याची कमतरता भरून निघते. उन्हाळ्यातही आल्हाददायी वाटतं.

हाडे मजबूत होतातताकामध्ये पुरेसे कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही ऑस्टिओपोरोसिस नावाच्या आजारापासून वाचू शकता.

पचनक्रिया व्यवस्थित राहतेताक प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते. ताक हे प्रोबायोटिक्सचं काम करतं, त्यामुळे शरीरात आतड्यांच्या कार्याला गती मिळते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.

अ‍ॅसिडीटीचा त्रास होत नाहीताक प्यायल्यानं अ‍ॅसिडीटीपासून जलद आराम मिळतो. जेवणानंतर काही वेळानी ताक पिऊ शकता. यामुळे अॅसिडिटीमुळे छातीत जळजळ होण्यापासून आराम मिळेल.

वजन कमी करण्यासाठीताक नियमित सेवन केल्याने तुम्ही वाढते वजन कमी करू शकता. ताकामध्ये कॅलरीज आणि फॅट कमी असतं. ताक एक प्रकारे फॅट बर्नर म्हणूनही काम करतं.

ताक पिण्याची योग्य वेळउन्हाळ्याच्या दिवसात विविध प्रकारचे मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं शरीरात सूज येऊ शकते. अशावेळी ताक प्यायल्यास ताक मसालेदार अन्नाचा प्रभावाला न्यूट्रल करतं. अन्न खाल्ल्यानंतर पोट जड वाटत असेल तर ताक घ्या. त्यामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात. पोट हलकं वाटतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स