Benefits of clove : लवंग हा मसाल्यातील पदार्थ प्रत्येकाच्या घरी असतो. जेवणात किंवा घरी काही स्पेशल पदार्थांची मेजवानी बनवताना त्यात आपण लवंगचा वापर करतो. या लवंगाचे सेवन केल्यास शरीराला असंख्य फायदे मिळतात. लवंगला वैज्ञानिकदृष्ट्या सीजिगियम एरॉमेटिकम म्हणून ओळखले जाते.बहुगुणकारी असलेले लवंग पुरषांसाठी लाभदायक मानले जाते. त्यात अँटीफंगल, अँटीबॅक्टीरियल, अँटीव्हायरल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटीकार्सिनोजेनिक असे अनेक गुणधर्म आढळतात.
रक्तदाब नियंत्रित येतो :
लवंगमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशिअम, पोटॅशिअम तसेच मिनिरल्स यांसारखी खनिजे आढळतात. ही खनिजे आरोग्यासाठी महत्वाची मानली जातात. तज्ञांच्या म्हणण्यानूसार, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रोल कंट्रोल करण्यासाठी नियमितपणे लवंगाचे सेवन केले पाहिजे. प्रामुख्याने लवंगात रक्तदाब नियंत्रित करणारे घटक असल्याने लवंग उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी फायदेशीर मानले जाते.
रोगप्रतिकारशक्ती वाढते :
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लवंग उपयोगी आहे, असे तज्ञ सांगतात. लवंगामध्ये विटामीन सी, झिंक नामक पोषक तत्वांमुळे शरीरातील इम्यूनिटी वाढते. अनेकदा संपर्कजन्य रोगांपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.
पुरुषांच्या आरोग्यासाठी वरदान :
पुरुषांनी लवंगाचे सेवन केल्यास त्यांच्या शरीरामध्ये टेस्टेस्टोरॉन संप्रेरकाची वाढ होते. शिवाय पुरुषांच्या शरीरात टेस्टेस्टोरॉनची पातळी वाढवण्यासाठी तसेच त्याच्यातील प्रजनन क्षमता सुधारण्यास लवंग मदत करते. म्हणून पुरुषांनी लवंग आणि त्याच्या संबंधित उत्पादनांचा वापर आयुर्वेदाचार्यांच्या सल्ल्याने घ्यावा.
दातांच्या समस्या होतील छुमंतर :
लवंगात अॅंटीबॅक्टेरिअल गुणांसहितअॅंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जे निरोगी दातांसाठी उपयोगी ठरतात. दातदुखीच्या बाबतीत लवंगाप्रमाणेच त्याचे तेल सुद्धा उपयोगी ठरते.