शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

रात्री झोपण्याआधी का प्यावं एक ग्लास पाणी? फायदे वाचून व्हाल अवाक्!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 9:52 AM

Water Drinking Before Sleep : अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी पिण्याचे काय फायदे मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Water Drinking Before Sleep : पाणी आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे. आपलं ७० टक्के शरीर पाण्यापासून बनलेलं असतं. त्यामुळे शरीरात जर पाणी कमी झालं तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. बरेच लोक रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आधी पाणी पितात. याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी पिण्याचे काय फायदे मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे फायदे वाचल्यावर तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी आठवणीने पाणी प्याल.

१) इम्यूनिटी वाढेल

झोपण्याआधी पाणी प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे वायरस आणि इन्फेक्शनपासून शरीराचा बचाव होतो. सर्दी, खोकला, ताप असे कॉमन आजारही तुमच्यापासून दूर राहतात. 

२) मेटाबॉलिज्म सुधारतं

झोपण्याआधी पाणी प्यायल्याने तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं. ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. मेटाबॉलिज्म बूस्ट झालं कॅलरी बर्न होण्याची प्रोसेस वेगाने होते. ज्यामुळे तुम्हाला वजनही वेगाने कमी करण्यास मदत मिळते.

३) किडनीसाठी फायदेशीर

झोपण्याआधी एक ग्लास पाणी प्यायल्याने किडनीचं आरोग्य चांगलं राहतं. याने रात्री झोपेत किडनीची सफाई होते आणि किडनी डॅमेजचा धोकाही कमी होतो.

४) जॉईंट्सची लवचिकता

झोपण्याआधी पाणी प्यायल्याने जॉईंट्सना सकाळी मोकळे आणि लवचिक होता. ज्यामुळे त्यात वेदना कमी होते आणि तुमच्या दिवसाची सुरूवातही चांगली होते. ज्या लोकांना नेहमीच जॉईंट्समध्ये वेदनेची समस्या असते त्यांनी रात्री झोपण्याआधी पाणी पिण्याची सवय लावावी.

५) त्वचेची सफाई

रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि सुंदर राहते. त्वचेसंबंधी समस्या असलेल्या लोकांनी आवर्जून ही सवय लावावी.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य