Turmeric Water : भारतात हळदीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. याने पदार्थांना एक वेगळा रंग मिळतो सोबतच टेस्टही वाढते. पण हळदीचे इतकेच फायदे नाहीत. हळद एक आयुर्वेदिक औषधी आहे. आयुर्वेदात हळदीला खूप महत्व आहे. शरीरातील विषारी पदार्थ आणि पदार्थांमधील बॅक्टेरिया नष्ट करण्याचं काम हळद करते. अनेक उपचारांमध्ये हळदीचा वापर केला जातो. पण हळदीचे सगळे फायदे लोकांना माहीत नसतात. त्यामुळे याचा योग्य वापरही लोक करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला हळदीचं पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत. खासकरून पावसाळ्यात याने तुम्हाला खूप फायदे मिळतील.
हळदीचं पाणी पिण्याचे फायदे
हळदीचं पाणी पिण्याचे फायदे जाणून घेण्याआधी हळदीचं पाणी तयार कसं कराल हे जाणून घेऊया. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद टाका. यात थोडं मधही टाकू शकता. याचं सेवन तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी करावं. याने पचनक्रिया चांगली राहते आणि दिवसभर एनर्जी मिळते. हे पाणी तुम्ही रात्री झोपण्याआधीही पिऊ शकता. याने शरीरातील विषारी पदार्थ सकाळी बाहेर निघतील.
सूज आणि दुखणं होईल कमी
हळदीमध्ये करम्यूमिन नावाचं एक तत्व असतं. ज्यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात. यांनीच शरीरातील सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळते.
पचन क्रिया सुधारते
हळदीचं पाणी प्यायल्याने पचन तंत्र मजबूत होतं. याने पोटातील एझांइम्स अॅक्टिव होतात जे पचनक्रियेसाठी गरजेचे असतात.
त्वचेसाठी फायदेशीर
हळदीचं पाणी प्यायल्याने त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. त्वचा चमकदार होते. तसेच त्वचेवरील डागही दूर होतात.
हृदयाचं आरोग्य
नियमितपणे हळदीच्या पाण्याचं सेवन केलं तर कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित राहते. ज्यामुळे तुम्हाला हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.
मूड चांगला राहतो
हळदीमध्ये अॅंटी डिप्रेसेंट गुण असतात. जे तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतात.