Water While Eating: नेहमीच आपल्याला सल्ला दिला जातो की, जेवण करताना पाणी कधीच पिऊ नये. असं केल्याने अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, काही लोक जेवण करताना पाणी पिऊ शकतात आणि याने त्यांची समस्याही दूर होते.
न्यूट्रिशनिस्ट रमिता कौर (Nutritionist Ramita Kaur) यांनी सांगितलं की, जेवण करताना पाणी पिऊ शकता, पण याची एक योग्य पद्धत असते. पाणी पिण्याच्या या पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि पाइल्स अशा समस्यांपासून सुटका मिळू शकते.
कमजोर पचन तंत्रात फायदेशीर
न्यूट्रिशनिस्टनुसार, जेवण करताना पाणी पिऊ शकता आणि ज्यांचं पचन कमजोर आहे त्यांच्यासाठी हे फायदेशीरही ठरेल. याने अन्न मुलायम होतं आणि सहजपणे पचतं. कमजोर पचन तंत्रामुळेच बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि पाइल्ससारख्या समस्या होतात.
शरीरातून निघतात विषारी पदार्थ
अन्न पचवताना शरीरात अनेक विषारी पदार्थ तयार होतात. हे विषारी पदार्थ शरीराला नुकसान पोहोचवतात. जेवण करताना योग्य पद्धतीने पाणी प्याल तर हे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते.
पाणी पिण्याची आयुर्वेदिक पद्धत
वर सांगण्यात आलेल्या फायद्यांसाठी तुम्हाला जेवणादरम्यान पाणी पिताना आयुर्वेदिक टिप फॉलो केली पाहिजे. जेवताना कधीही गरज वाटली तर पाण्याचा एक छोटासा घोट प्यावा. लक्षात ठेवा की, जास्त पाणी प्यायचं नाहीये, फक्त एक घोट प्यायचं आहे.
जेवणानंतर लगेच पिऊ नका पाणी
जेवणाच्या एक तासआधी आणि जेवणानंतर 1 तास पाणी पिऊ नये. असं केलं तर पचनासाठी पोटात पेटलेली अग्नि स्लो होते आणि पचनासाठी आवश्यक अॅसिडही कमजोर पडतं. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात.
या गोष्टींची घ्या काळजी
1) नेहमी खाली बसूनच पाणी प्यावे.
2) एकाचवेळी खूप जास्त पाणी पिऊ नये
3) हलकं-कोमट पाणी प्यावं, मडक्यातील पाणीही पिऊ शकता.
4) सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाणी प्या.