शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाल्ल्याने काय होतं? वाचाल तर रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 12:11 IST

Ajwain Benefits : तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून 'या' समस्या दूर ठेवू शकता. हा पदार्थ म्हणजे ओवा.

Ajwain Benefits : बदलत्या वातावरणात सगळ्यांनाच सर्दी-खोकला, ताप, इन्फेक्शन होणं कॉमन आहे. यामुळे आपल्या शरीरात थोडी कमजोरी येऊ लागते आणि कशातही मन लागत नाही. त्यामुळे वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्यांबाबत आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या किचनमधील एका पदार्थाचं सेवन करून 'या' समस्या दूर ठेवू शकता. हा पदार्थ म्हणजे ओवा. रोज रात्री झोपण्याआधी ओवा खाण्याचे फायदे वाचाल तर रोज ओवा खाल. चला जाणून घेऊया याचे फायदे...

रात्री ओवा खाण्याचे फायदे

ओवा हा तसा प्रत्येक घरात असतो. लोक वेगवेगळ्या प्रकारे याचं सेवन करतात. कुणी पदार्थाला टेस्ट आणण्यासाठी तर कुणी जेवण झाल्यावर मुखवास म्हणून याचं सेवन करतात. ओवा उष्ण असतो, त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे याचं सेवन केलं तर सर्दी, खोकला लगेच दूर होऊ शकतो.

ओवा खाण्याची पद्धत

ओव्याचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पदार्थात मिक्स करून करू शकता. तसेच काही हेल्थ एक्सपर्ट ओव्याचा चहा पिण्याचा सल्ला देतात. हा चहा तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून उकडून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या आणि त्याल मध व लिंबाचा रस टाकून सेवन करा. याने शरीराला उष्णता मिळेल आणि वातावरण बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर होतील. तसेच रात्रभर एक चमचा ओवा एक ग्लास पाण्यात टाकून ठेवा. सकाळी हे पाणी सेवन करा आणि ओवा चावून खा.

ओवा खाण्याचे फायदे

कोलेस्ट्रॉल कमी होतं

ओव्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात. जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यावर झालेल्या शोधातून समोर आलं की, यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

सर्दी-खोकल्यापासून बचाव

बदलत्या वातावरणात सर्दी-खोकला-ताप होणं कॉमन आहे. अशात ओव्यापासून तयार केलेला चहा घेतला तर या समस्या लगेच दूर होतील. कारण याने शरीरात जमा झालेला कफ बाहेर येतो.

पोट होईल साफ

ओव्याचा वापर नेहमीच पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी केला जातो. जर तुम्हालाही पोट साफ होत नसल्याची समस्या असेल तर ओव्याचं सेवन नक्की करा.

वजन कमी करण्यास मदत

ओव्यामध्ये थायमोल नावाचं तत्व असतं. जे तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट करतं. जेव्हा तुमचं मेटाबॉलिज्म बूस्ट होतं तेव्हा नवीन फॅट तयार होत नाही आणि जुनं फॅट सहजपणे बर्न होतं. त्यामुळे ओव्याच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.

वायरल इन्फेक्शनपासून बचाव

ओवा खाल्ल्याने बदलत्या वातावरणात अनेक प्रकारच्या संक्रमणापासून बचाव केला जाऊ शकतो. इन्फेक्शनपासून याने बचाव केला जातो. त्यामुळे ओव्याचं नियमितपणे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य