शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

जमिनीवर मांडी घालून बसून जेवण केल्याने काय होतं? फायदे वाचाल तर डायनिंग टेबल विसराल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 10:52 AM

खाली बसून जेवण्याच्या सवयीने तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळतात. महत्वाची बाब म्हणजे आयुर्वेदातही याचे खूप फायदे सांगण्यात आले आहेत.

आजकाल लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. जुन्या चांगल्या गोष्टी आणि सवयी मागे पडत चालल्या आहेत. तुम्हाला आठवत असेल की, आधी घरात सगळे लोक एकत्र खाली बसून जेवण करत होते. पण आता लोकांच्या घरात डायनिंग टेबल आला आहे. लोक सोफ्यावर बसूनही जेवण करतात. मात्र, त्यांना खाली बसून जेवण्याचे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही सांगणार आहोत. खाली बसून जेवण्याच्या सवयीने तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळतात. महत्वाची बाब म्हणजे आयुर्वेदातही याचे खूप फायदे सांगण्यात आले आहेत.

खाली बसून जेवण्याचे फायदे...

शरीराची हालचाल वाढते..

- जमिनीवर खाली बसून जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारते. जमिनीवर ताट असल्याने आपल्याला घास घेण्यासाठी सतत वाकावे लागते. यामुळे शरीराची हालचाल होऊन अन्न योग्य पद्धतीने पचतं. जमिनीवर बसून जेवल्यास वजन कमी करण्यात मदत होते. तसेच पोट सुटत नाही. अपचन, जळजळ असे पोटाचे विकारही होत नाहीत.

नसा मोकळ्या होतात

- जेवण करताना मांडी घालून बसल्याने शरीराच्या नसांचा मोकळ्या होतात. डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. शरीराची लवचिकता वाढते. आपण जेव्हा जमिनीवर बसून जेवतो, तेव्हा पाठीचा कणा ताठ राहतो. तसेच पोट, पाठ, खाद्यांची सतत हालचाल होत राहते.

आवश्यक तेवढं जेवण

- सुखासन किंवा मांडी घालून जमिनीवर बसणे आणि जेवण करणे यामुळे जास्त जेवण केल्यास योग्य प्रमाणात जेवण करता येतं. हा लठ्ठपणा कमी करण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. खाली बसून जेवल्याने जेवढे आवश्यक आहे, तेवढेच आपण अन्न ग्रहण करतो. त्यामुळे पचन तंत्र सुरळीत राहतं आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते. व्यक्तीचे वजन नियंत्रित राहते.

पाठीचा कणा चांगला राहतो

- पाठीचा कणा ताठ व मजबूत होतो आणि पाठीच्या समस्या दूर होतात. तसेच खाली बसून जेवल्याने जेवणावर जास्त लक्ष असतं. मेंदू शांत राहतो. मेंदूला लवकर कळतं की, आपलं पोट भरलं आहे. खुर्चीवर बसून किंवा उभे असताना रक्तपुरवठा हा पायाकडे जात असतो. त्यामुळे पचन तंत्र सुरळीत काम करीत नाही. याने अपचन, ऍसिडिटी व इतर रोगांना आमंत्रण दिल्या जातं.

कॅलरीज कमी होतात

जमिनीवर बसून जेवण हळूहळू करता येतं. यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. हे शरीरासाठी चांगलं असतं. यामुळे अधिक कॅलरीचे सेवन होत नाही.

गुडघे दुखीची समस्या दूर होते

जमिनीवर बसून खाल्ल्याने नितंबाच्या जोड, गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही. हाडांचे रोग, समस्या दूर राहतात.

हृदय निरोगी राहतं

मांडी घालून बसणं हे वेगवेगळ्या योगासनातील एक आसन आहे. या आसनामध्ये शरीर आरामदायी अवस्थेत असतं आणि तणाव दूर होतो. हृदय देखील स्वस्थ राहतं. बसून खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण सहज होते. जमिनीवर बसून खाल्ल्याने माणूस उठताना आधार न घेता उठतो यामुळे शरीर मजबूत आणि लवचिक राहते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य