Winter Health Tips: संत्री हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातं. गोड, रसाळ असणारी संत्री प्रत्येकाला खायला आवडतात. प्रामुख्याने हिवाळ्यात हंगामी फळांना मोठी मागणी असल्याने संत्री खरेदीला ग्राहकांची पहिली पसंती असते. त्यामुळेच हंगामी फळे खाणं हा संतुलित आहाराचा सर्वात सोपा मार्ग समजला जातो.
या हंगामी काळात वेगवेगळ्या फळांबरोबर संत्रीही बाजारात सहज उपलब्ध होतात. त्यामुळे आज आपण तज्ञांच्या मते हिवाळ्यात दररोज संत्री खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे किंवा नाही त्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो या संदर्भात जाणून घेणार आहोत.
सर्दी, खोकल्यापासून सुटका:
संत्र्यांमध्ये विटॅमीन सी सारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे हिवाळ्यात संत्री खाल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते तसेच अनेक संसर्गजन्य रोगांशी लढण्यास मदत करते. शिवाय सर्दी, खोकल्यापासून संरक्षण होते.
यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स त्वचेला नुकसानकारक असणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात.
वारंवार भूक लागत नाही :
आहारतज्ञांच्या म्हणण्यानूसार, संत्र्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. संत्री डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात.