शरीराला आवश्यक असणारी जीवनसत्वं आपणाला दैनंदिन आहारातून मिळतात. हॉटेल किंवा जंक फूडऐवजी आजही आपल्या घरात तयार होणारा स्वंयपाकच आरोग्यासाठी महत्त्वाचा ठरतो. स्वयंपाकघरात असलेले अनेक पदार्थ रोगांना दूर ठेवण्यासाठी मदत करत असतात. यात सर्दी-खोकला झाला की आल्याचा (Ginger) रस घेतला जातो किंवा आल्याच्या चहाला आपण प्राधान्य देतो. केवळ सर्दी खोकलाच नव्हे तर इतरही बऱ्याच रोगांना दूर ठेवण्याचं कामं आलं करत असतं.
सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय म्हणून आलं सर्रास वापरलं जातं. बॅक्टेरियल आणि फंगल संसर्गाशी ( Bacterial & Fungal Infection) लढण्यासाठी आलं मदत करतं. याशिवाय सांधे आणि स्नायुंचं दुखणं कमी करण्यासाठी आल्याचा चांगला उपयोग होतो. आल्याचं सेवन केल्याने संधिवाताच्या समस्येवर दिलासा मिळू शकतो. आल्यात सूज कमी करण्याची आणि वेदनाशामक शक्ती असते. या दोन्ही गुणांमुळे आलं खाल्ल्याने स्नायूंच्या दुखण्यापासून दिलासा मिळू शकतो.
मायग्रेनचा त्रास असल्यास घ्या आल्याचा चहाएखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा त्रास असल्यास त्याच्यासाठी आलं फार महत्त्वाचं ठरतं. आल्याचा चहा घेतल्यास त्याला उपकारक ठरू शकतो. आल्याचा चहा घेतल्यानंतर प्रोस्टेग्लॅडिनचा त्रास कमी होतो. असह्य त्रासापासूनही मुक्ती मिळू शकते.
लिव्हर, किडनी स्वच्छ ठेवण्याचं काम करतं आलंडायबेटिस असणाऱ्या व्यक्तींसाठीही आलं महत्त्वाचं ठरतं. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी व इन्शुलिनची सक्रियता वाढवण्यासाठी आलं चांगल काम करतं असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. आलं लिव्हर, किडनीला स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतं.
वजन कमी करायचे असल्यास होईल फायदाआलं हे शरीरातील चरबी जाळण्याचं (Fat Burner) काम करत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. आल्याच्या सेवनाने पोट, कंबर आदी ठिकाणची अतिरिक्त चरबी कमी होते. स्थुलत्वाशी संबंधित धोकाही आल्यामुळे दूर होऊ शकतो. सकाळी आलं असलेलं कोमट पाणी प्यायल्यास शरीराला मारक घटक घामावाटे शरीरातून निघून जातात व आपलं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी याची मदत होऊ शकते.
स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी नेहमी वापरल्या जाणाऱ्या आल्यामध्ये अनेक औषधी गुण आहेत. केवळ एखाद्या भाजीत किंवा चहापुरता त्याचा मर्यादित वापर न करता नेहमी त्याचं सेवन करायला हवं, असं आहारतज्ज्ञही सांगत असतात. बाजारात जेव्हा आलं स्वस्त असतं तेव्हा त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करून ते वाळवून त्याची सूंठ तयार केल्यास मधासोबतही त्याचं सेवन करता येतं. विशेष म्हणजे आरोग्याला त्याचे चांगले फायदे मिळू शकतात.