बरेच लोक चालण्याने वजन कमी होत नाही म्हणून वैतागून जातात आणि शेवटी ते चालणे बंद करतात. तुमच्यासोबतही असेच काही घडत असेल तर इंटरव्हल चालणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. वास्तविक, इंटरव्हल वॉकिंगमध्ये (Interval Walking) तुम्हाला लवकर-लवकर चालावे लागते जेणेकरून जास्त चरबी जाळली जाऊ शकते आणि वजन झपाट्याने कमी (Weight Loss) होते. या चालण्याच्या दरम्यान शरीराला अनेक ब्रेक दिले जातात आणि प्रत्येक ब्रेकसाठी एक वेळ निश्चित केली जाते.
इंटरव्हल चालण्यामुळे शरीराला जास्त थकवा येत नाही आणि लवकर रिकव्हरही होते. इंटरवलदरम्यान तुम्ही सामान्य श्वासोच्छ्वास करता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे फिटनेस ध्येय गाठणे सोपे होते. अशा प्रकारे, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर इंटरवल ट्रेनिंग हा (Interval Walking For Weight Loss) सर्वोत्तम मार्ग असू शकतो.
इंटरव्हल चालण्याची पद्धत
पहिली स्टेपयासाठी तुमच्याकडे स्मार्टवॉच किंवा स्टॉप वॉच असेल तर अधिक व्यवस्थित होईल. सर्व प्रथम ५ मिनिटांत वॉर्म अप वॉक करा. या ५ मिनिटात संथ गतीने चाला म्हणजे जास्त थकवा येणार नाही. असे केल्याने शरीर उबदार राहते आणि स्नायूंना पूल होणार नाही. यानंतर, एका मिनिटात सुमारे १०० पावले चालण्याचे ठरवा. यावेळी, खोल खोल श्वास घ्या. तुमचा श्वास सामान्य राहील याकडे लक्ष ठेवा.
दुसरी स्टेपवॉर्म अप केल्यानंतर तुमचा पहिला इंटरवल सुरू करा. जर तुम्ही हे पहिल्यांदा करत असाल तर ३० सेकंदांचा गॅप ठेवा. या दरम्यान चालताना छोटी पावले टाका आणि पूर्ण जोर देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आपले हात पुढे आणि मागे जोरदारपणे हलवा. इथे तुमचा श्वास थोडा लहान होऊ लागेल. 30 सेकंदांनंतर, सामान्य चालण्याकडे परत या आणि २.३० मिनिटे तसेच चालणे ठेवा. त्याचप्रमाणे ५ पूर्ण इंटरवल करा आणि जेव्हा हा वर्क आऊट पूर्ण होईल, तेव्हा शेवटी 5 मिनिटांच्या कूल डाउनेच पूर्ण करा.
तिसरी स्टेपअशाप्रकारे, जर तुम्ही अर्ध्या तासाच्या वर्कआउटचे नियोजन करत असाल, तर सुरुवातीला ५ मिनिटे लाइट वॉर्म अप, ५ व्या ते ७ व्या मिनिटाला जलद चालणे, ७ व्या ते ८ व्या मिनिटाला लाइट वॉक, ८ते १०व्या मिनिटाला शक्य तितक्या वेगाने चालणे. नंतर १० व्या ते ११ व्या मिनिटापर्यंत हळू चालत जा. त्यानंतर, ११ ते १३ व्या मिनिटापर्यंत वेगाने चालत जा. त्यानंतर १३-१४व्या मिनिटाला हलके चालावे. १५ मिनिटांनंतर, ते आणखी हलके. मग हळूहळू चालणे वाढवा. २५ व्या ते ३० व्या मिनिटात, अतिशय हलके चालताना हळू हळू थांबा. अशा प्रकारे, तुम्ही अर्धा तास वेगाने आणि हळू चालत रहा.
इंटरवल वॉकिंग अॅडवान्स लेवलवर नेण्यासाठी टिप्स
- विश्रांतीची वेळ कमी करा.
- डोंगराळ किंवा उंच भागात चाला.
- तुमचा वेग वाढवा.
- बराच वेळ चाला.