शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

डायबिटीस रुग्णांसाठी 'या' पीठाची चपाती शुगर कंट्रोल करण्याचा उत्तम उपाय, सुरु करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 6:38 AM

प्रोटीनचा स्रोत असलेल्या हरभरा डाळीच्या अर्थात बेसन पिठाचं सेवन डायबेटीस रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे भजी, वडे हे पदार्थ वगळून या पिठाचे अन्य पदार्थ डायबेटीसचे पेशंट नक्कीच खाऊ शकतात.

डायबेटीस अर्थात मधुमेह (Diabetes) हा गंभीर स्वरूपाचा, तसंच गुंतागुंत निर्माण करणारा आजार (Disease) आहे. डायबेटीसमुळे अन्य आजारांचा धोका संभवतो. डायबेटीसमध्ये ब्लड शुगर पातळी (Blood Sugar Level) नियंत्रणात राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. ब्लड शुगर पातळी सातत्यानं वाढत असेल, तर ती डायबेटीसच्या रुग्णासाठी धोक्याची घंटा असते. कारण यामुळे अन्य हृदयविकारासारखे अन्य आजार होण्याचा धोका वाढतो. ब्लड शुगर नियंत्रणात राहावी, यासाठी रुग्णाने पोषक आणि योग्य आहार (Diet) घेणं आवश्यक असतं.

ब्लड शुगर पातळी नियंत्रणात ठेवून चौरस आहार घेण्याचं आव्हान रुग्णासमोर असतं. आपल्या खाद्यसंस्कृतीतले अनेक पदार्थ यासाठी उपयुक्त ठरू शकतात. डाळीचं पीठ अर्थात बेसन (Gram-Chickpea Flour) हे त्यापैकीच एक होय. सर्वसामान्यपणे बेसनाचा वापर भजी, वडे आदी पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. हे पदार्थ खाणं डायबेटीसच्या रुग्णांसाठी जोखमीचं ठरू शकतं; पण प्रोटीनचा स्रोत असलेल्या हरभरा डाळीच्या अर्थात बेसन पिठाचं सेवन डायबेटीस रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे भजी, वडे हे पदार्थ वगळून या पिठाचे अन्य पदार्थ डायबेटीसचे पेशंट नक्कीच खाऊ शकतात. याविषयी माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे.

रुग्णाचा डाएट असावा हेल्दीडायबेटीसच्या रुग्णांसाठी आहार हा महत्त्वाचा घटक असतो. कारण या रुग्णांच्या आहाराच्या सवयीवर त्यांची ब्लड शुगर पातळी अवलंबून असते. त्यामुळे या रुग्णांचा डाएट (Healthy Diet) हेल्दी असणं आवश्यक असतं. तसंच आहाराच्या माध्यमातून सर्व प्रकारची जीवनसत्त्वं, प्रोटीन्स शरीराला मिळणं आवश्यक असतं. बेसन पिठापासून बनवलेले पदार्थ डायबेटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतात. डायबेटीसच्या रुग्णाने बेसन पिठाच्या चपात्या (Roti) खाणं फायदेशीर ठरतं. कारण त्यातून शरीराला अनेक पोषक तत्त्वं मिळतात. तसंच या पिठात अन्य पिठांच्या तुलनेत कॅलरीज कमी असतात. डायबेटीसच्या रुग्णांसाठी बेसन हा उत्तम पर्याय असला, तरी बेसन पिठापासून तयार केलेल्या चपात्याच खाणं गरजेचं आहे. बेसन पिठापासून बनवलेली भजी, वडे किंवा पराठे खाल्ल्यास या तेलकट पदार्थांमुळे बॅड कोलेस्टेरॉलची पातळी उंचावून हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

काय आहेत बेसनाचे गुणधर्म?बेसनाचा ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic index) खूप कमी असतो. तसंच बेसनामध्ये पोटॅशियम, मॅंगनीज, कॉपर, झिंक, व्हिटॅमिन बी -6, थायमाइन, फायबर, आयर्न, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि फॉलेट यांसारखी पोषक तत्त्वं असतात. त्यामुळे बेसन डायबेटीसच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे बेसन पिठाची चपाती खाण्याचा सल्ला अनेक आरोग्यतज्ज्ञ देतात. परंतु, डायबेटीसच्या रुग्णांनी बेसनाचं सेवन मर्यादित ठेवणंदेखील आवश्यक आहे

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स