माणसाच्या शरीराला प्रोटीन्स, फॅट्स, कार्ब्स, या तीन्ही गोष्टी गरज असते. जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर शरीरात या तीन्ही गोष्टी योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. खासकरून शरीरातील प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी अंडी, चिकन, मटणचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. पण सध्या बर्ड फ्लूच्या भीतीमुळे लोक चिकन खाणं टाळत आहेत. तुम्हीसुद्धा चिकन खाणं बंद केलं असेल किंवा करणार असाल तर आज आम्ही तुम्हाला शरीरातील प्रोटीन्सची कमरता भरून काढणारे काही पदार्थ सांगणार आहोत. या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता.
चणे
चिकन खाण्याऐवजी तुम्ही भिजवलेले चणे खाऊ शकता. चण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते. चण्यांच्या सेवनानं तुमचा संपूर्ण दिवस एनर्जीने भरलेला जाईल. बर्ड फ्लूमुळे तुम्ही चिकन खात नसाल तर चणे हा एक उत्तम ऑप्शन आहे.
पनीर
तुम्ही आहारात पनीरचाही समावेश करू शकता. पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. कार्ब्स यात जराही नसतात. चिकनऐवजी तुम्ही पनीराचा आहारात समावेश करू शकता.
राजमा
राजमा हा प्रोटिन्सचा समृद्ध स्त्रोत मानला जातो. 180 ग्रॅम राजमामधून साधारण 15 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. राजमा ज्याला किडनी बीन्स असंही म्हणतात, जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. एक कप उकडलेल्या राजम्यामध्ये जवळपास 15 ग्रॅम प्रोटीन असतं. जर तुम्ही शाकाहारी असाल तर राजम्यामधून प्रोटीन्सही मिळतात. राजमामध्ये फेजोलिन नावाच्या प्रोटीनमुळे शरीराचा अॅलर्जीपासून बचाव होतो.
याव्यतिरिक्त राजमामध्ये रेक्टिन्स आणि प्रोटीन्सदेखील असतात. राजमामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे राजमा खाल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. फायबर पोट साफ करण्यासाठी मदत करतं. आणि त्यामुळे लिव्हरच्या समस्याही ठिक होतात. राजमा खाल्याने शरीरामध्ये ब्यूट्रेट, एसीटेट आणि प्रॉपिनेट यांसारखे फॅटी अॅसिड निर्माण होतात. ज्यामुळे कोलन कॅन्सरची आशंका कमी होते.
हेल्दी समजून डायजेस्टिव्ह बिस्किट खात असाल; तर तुम्हालाही होऊ शकतो 'असा' त्रास
डाळी
डाळीसुद्धा प्रोटीन्सचा एक उत्तम मार्ग आहे. आहारात सर्व प्रकारच्या डाळींचा समावेश असायलाच हवा. मूग, उडीद, तूर किंवा चण्याच्या डाळीच्या आहारात समावेश करून तुम्ही प्रोटीन्सची कमतरता भरून काढू शकता. याशिवाय दोन चमचे पीनट बटरमध्ये साधारण 8 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. 100 ग्रॅम दह्यातून साधारण 10 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. 180 ग्रॅम कोबी सेवन केल्यास साधारण 5 ग्रॅम प्रोटीन्स शरीराला मिळतात. एक मुठभर सुकामेवा खाल्ल्यास साधारण 6 ग्रॅम इतके प्रोटीन्स मिळतात. ब्रोकली हा प्रोटीन्सचा समृद्ध स्त्रोत आहे.