मुंबई : उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता झाल्यानं त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. तसंच तापमानात अचानक वाढ झाल्याने विषाणूजन्य आजारांतही वाढ होते. उष्णता वाढल्याने शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे शरीराला थंडावा मिळवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात खरबूज हे फळ सर्वोत्तम आहे. यामध्ये पोषण तत्वे भरपूर प्रमाणात आहेत.
खरबुजात पाणी तसंच जीवनसत्त्वे आणि क्षाराचे प्रमाण 95 टक्के इतकं असते. ज्यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. पिकल्यानंतर या फळाचा रंग पिवळा होतो. पिकलेले फळ हे त्याच्या चविष्ट घट्ट गोडसर गरासाठी प्रसिद्ध आहे.
ग्रीन टी पिताना घ्या ही काळजी, या गोष्टींसाठी घ्या ग्रीन टी!
खरबुजाच्या या गुणामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शरीराचे तापमान सर्वसाधारण राखण्यास मदत होते. खरबुजामध्ये असलेले पाण्याचे मोठे प्रमाण शरीरात कधीच अपचन होऊ देत नाही. खरबुजामधील क्षारमुळे पचनसंस्था उत्तम राहते. खरबुजातील असलेले कॅरिटीनॉयड कर्करोगापासून बचाव करण्यासाठी मदत करते. विशेषत: खरबूजातील बिया याबाबत खूपच फायदेशीर ठरतात.
खरबुजात एंडीनोसीन नावाचे तत्त्व असते. जे शरीरात रक्ताची गुठळी वा डाग होऊ देत नाही. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो. याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो. खरबुजाचे नियमित सेवन किडनी समस्येतील रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.
थंड दूध पिण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
विशेषकरून लिंबाच्या रसाबरोबर त्याचे सेवन युरिक अँसिडशी संबंधित समस्या दूर करते. नितळ त्वचेसाठीही खरबूज उपयोगी आहे. त्याच्यामध्ये कोलाजेन नावाचे तत्त्व मोठय़ा प्रमाणात असते जे त्वचेला सौंदर्य व कांती प्रदान करते.