तसं तर उचकी येणं फारच कॉमन आहे. सामान्यपणे पाणी प्यायल्यावर उचकी निघूनही जाते. पण काही लोकांसाठी सामान्य उचकी मोठी समस्या उभी करते. एकदा त्यांना उचक्या सुरू झाल्या तर थांबायचं नावच घेत नाहीत.
जर तुम्हीही अशांपैकी एक असाल तर चिंता करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही तुम्हाला उचक्या थांबवणे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळेल. उचक्या लागल्यावर लोक कुणीतरी आठवण काढत असल्याचा तर्क देतात. पण असं काही नसतं.
उचकी येण्याचं कारण
उचक्या येण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, भूकेपेक्षा जास्त जेवण करं, तिखट पदार्थ खाणं, घाईघाईने खाणं, अॅसिड रिफ्लक्स, गरमनंतर थंड खाणं, स्ट्रेस, सिगारेट ओढणे, पचनात गडबड इत्यादी. काही केसेसमध्ये हे गंभीर आजाराचं लक्षणही असू शकतं. अशात जर तुम्हाला नेहमीच उचकीची समस्या होत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
काय आहे उपाय
एका रिसर्चमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की, एक ग्लास पाण्यात एक चमका पाणी मीठ टाकून प्यायल्यास उचकी लगेच बंद होते. इतकंच नाही तर काही लोक उचकी थांबवण्यासाठी एक चमचा साखरही खातात. यानेही त्यांना आराम मिळतो. एनएचएसने या उपायाचं समर्थन केलं आहे.
काही सेकंद श्वास रोखा
उचकी थांबवण्यासाठी एनएचएस द्वारे जारी करण्यात आलेल्या गाइडलाईन्सनुसार, काही सेकंदासाठी श्वास रोखून ठेवल्यावरही ही समस्या दूर करता येऊ शकते. हा उपाय आधीच्या काळात आपल्या घरातील मोठे लोक वापरत होते.
थंड पाणी प्या
एनएचएस गाइडलाईननुसार, एक ग्लास थंड पाणी हळूहळू प्यायल्याने उचकीची समस्या दूर केली जाऊ शकते. एका शोधात सांगण्यात आलं आहे की, थंड पाणी डायाफ्रामच्या मांसपेशींना आराम मिळवून देतं. यामुळे उकची लागणी आधीपेक्षा कमी होतं किंवा पूर्ण बंद होते.