शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

पावसाळ्यात डासांना घरापासून दूर ठेवतात ही झाडं, तुमच्याकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 11:17 AM

How to keep mosquitos away : अशीही काही झाडे असतात ज्यांच्या मदतीने तुम्ही डास पळवून लावू शकता. ही झाडे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलीत तर डास नक्कीच कमी होतील. 

How to keep mosquitos away : पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे घराघरांमध्ये डासांनी थैमान घातलं आहे. डासांमुळे डेंग्यू, मलेरियासारखे गंभीर आजारही होतात. अशात डासांना पळवण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. पण डास पूर्णपणे पळत नाहीत. डास झाडांमुळेही वाढतात. मात्र, अशीही काही झाडे असतात ज्यांच्या मदतीने तुम्ही डास पळवून लावू शकता. ही झाडे जर तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात लावलीत तर डास नक्कीच कमी होतील. 

1) लॅव्हेंडर

लॅव्हेंडरचा सुंगध हा डासांना तुमच्या घरात येण्यापासून रोखतो. जांभळ्या रंगाचं फूल असलेलं हे झाड उन्हाळ्यात सहज मिळतं. हे झाड तुम्ही तुमच्या घराच्या बाल्कनीत लावू शकता.

2) पेटूनिया

पेटूनिया हे एक फारच आकर्षक फूल आहे जे तुम्ही अनेकदा कुठेना कुठे पाहिलं असेल. हे फूल बाराही महिने उगवतं. या फुलाला नैसर्गिक किटकनाशकही म्हटलं जातं. या फूलाचं झाड तुमच्या घराच्या आवारात किंवा घरात लावल्यास डास कमी येतील.

3) सिट्रोनेलो

सिट्रोनेला ही एक सुंगधी वनस्पती आहे. या वनस्पतीपासून तयार करण्यात आलेल्या अगरबत्तीही तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतील. या वनस्पतीच्या मदतीने डास पळवता येऊ शकतात.कारण या वनस्पतीच्या वासामुळे डास पळतात. त्यांना या वनस्पतीचा वास सहन होत नाही. ही वनस्पती तुम्ही तुमच्या अंगणात किंना बाल्कनीमध्ये लावू शकता.

4) पुदीना

तसा तर पुदीन्याचा वापर खाण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यासोबतच पुदीन्याचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठीही केला जातो. याच पुदीन्याचं रोप तुम्ही घरात लावल्यास डासांपासून सुटका मिळवू शकता.

5) लेमनग्रास

लेमनग्रास हे साइट्रोनला या प्रजातीचं गवत आहे. ज्या ठिकाणी लेमनग्रास असते त्या ठिकणी डास जास्त काळ राहू शकत नाहीत. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सmonsoonमोसमी पाऊस