Lifestyle Tips : बरेच लोक रात्री असा विचार करून झोपतात की, ते सकाळी लवकर उठतील, नाश्ता करतील आणि मग ऑफिसला वेळेत जातील. पण सगळ्यांनाच हे शक्य होत नाही. अनेकजण ठरवूनही सकाळी लवकर झोपेतून उठत नाहीत. जर तुमच्यासोबतही असं होत असेल यावर काय उपाय करावा हे आ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जागण्याची आणि झोपण्याची वेळ फिक्स करा
जेव्हा तुम्ही रोज एकाच ठरलेल्या वेळी झोपत असाल आणि सकाळी झोपेतून उठत असाल तर याची बायोलॉजिकल क्लॉकला सवय होते. अशात रोज त्याच वेळेवर तुम्हाला जाग येते. रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही ७ ते ८ तासांची झोप घेता तेव्हा सकाळी झोपेतून उठण्याची समस्या होत नाही.
सुट्टीच्या दिवशी उशीरा झोपू नका
जर तुम्ही रोज वेळेवर झोपेतून उठत असाल आणि सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपत असाल तर यानेही तुमचं शेड्यूल बिघडू शकतं. शेड्यूल दररोज सामान्यपणे एकसारखं राहतं, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी सुद्धा लवकर उठण्यात काही समस्या होत नाही.
कूलिंग कमी ठेवा
रात्री कूलिंग जर जास्त असेल किंवा रूम जास्त थंड असेल तर रात्री झोपमोडही होऊ शकते. ज्यामुळे सकाळी लवकर उठण्यात समस्या होऊ शकते. त्यामुळे रात्री कुलिंग जास्त ठेवू नका.
पडदे उघडा किंवा लाईट लावा
जर सकाळी रूममध्ये अंधार असेल तर तुमचं सकाळी लवकर उठण्यासाठी मन होणार नाही. अशात सकाळी खिडक्यांचे पडदे उघडा किंवा लाईट लावा. याने तुम्हाला लवकर जाग येईल.
अलार्म दूर ठेवा
अलार्म तुमच्यापासून दूर ठेवा, कारण तो जवळ असला तर तुम्ही तो बंद करून पुन्हा झोपाल. जर अलार्म दूर असेल तर तुम्हाला तो बंद करण्यासाठी उठून चालत जावं लागेल याने तुम्हाला लवकर जाग येईल.