शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
2
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
3
"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल
4
आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार
5
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
6
मुलीसुद्धा डेटवर जातात, मग एकट्या मुलावर कारवाई कशासाठी? कोर्टाने उपस्थित केला सवाल
7
Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर
8
भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?
9
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार
10
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
11
Sanjay Raut : 'आता दाऊदला क्लीन चिट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे, संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
12
पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग
13
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
14
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
15
दर महिन्याला EMI भरावा लागत नाही असं लोन माहितीये का? इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं कामी
16
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट
17
अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल
18
शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा
19
केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा
20
"भरपाई आणि विम्यात फरक असतो"; हुतात्मा अग्निवीरांना मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप

मुलांना कफ सिरप देताय? सावधान!

By संतोष आंधळे | Published: December 20, 2022 6:20 AM

डॉक्टरांच्या नातवावर दुष्परिणाम; वेळीच धावपळ केल्याने वाचले प्राण

मुंबई : प्रत्येक घरात कफ सिरप असते. सर्दी-पडसे आणि खोकला झाल्यावर त्याचा हमखास वापर केला जातो; मात्र हेच कफ सिरप लहानग्यांसाठी घातक ठरत असल्याचे वास्तव आहे. दक्षिण मुंबईतील एका नामांकित डॉक्टरांच्या अडीच वर्षांच्या नातवाबाबत हा प्रकार घडला. सुदैवाने वेळीच उपचार केल्याने बाळाचे प्राण वाचले; या निमित्ताने कफ सिरपचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

दक्षिण मुंबईतील ग्रँट रोडमध्ये गावदेवी येथे एक नामांकित डॉक्टर राहतात. त्यांच्या अडीच वर्षांच्या नातवाला खोकला येत असल्याने १५ डिसेंबर रोजी त्याला कफ सिरप देण्यात आले; मात्र औषध दिल्यानंतर काही मिनिटांतच बाळ एकदम शांत झाले. त्याचे अंग थंड पडले. चेहऱ्यावरील रंग निळसर होत गेला. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने बाळास सीपीआर देण्यास सुरुवात केली. हाजी अली येथील लहान मुलांच्या रुग्णालयात बाळाला दाखल करण्यात आले. वेळीच योग्य उपचार मिळाल्याने बाळाचे प्राण वाचले. अनेकदा लहान मुलांना खोकला झाला की त्यास कफ सिरप देण्याचा सल्ला दिला जातो. काही वेळा तर पालक स्वतःहूनच बाळांना सिरप देतात; मात्र अशा पद्धतीने सिरप दिल्यास धोके संभवतात असे, तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

संबंधित डॉक्टर म्हणाले की, चार वर्षांखालील बाळांना कफ सिरप देण्यास अमेरिकेत मनाई आहे. भारतात लहान मुलांना कफ सिरप कसे दिले जाते, याचे आश्चर्य वाटते. यासंदर्भात डॉक्टर आणि पालकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. 

सीपीआर म्हणजे काय ?  कार्डिओपल्मोनरी रिससायटेशन (सीपीआर) ही प्राथमिक उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते.  एखाद्या व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका येतो. त्यावेळी काही काळाकरिता त्या व्यक्तीचा श्वासोच्छवास किंवा रक्ताभिसरण थांबते.  त्यावेळी त्या व्यक्तीच्या छातीवर दोन्ही हाताने दाब देऊन पंपिंग केले जाते. अनेकदा सीपीआरच्या माध्यमातून रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

तीन वर्षांखालील मुलांना कफ सिरप दिले जात नाही. कारण त्याचा फारसा परिणाम होत नाही. हे सिरप दिल्यानंतर हृदयाचे ठोके वाढण्याची शक्यता अधिक असते. बाळांना सुस्ती येऊ शकते. त्यामुळे याबाबत नागरिकांनी सतर्क राहायला हवे. डॉ. विजय येवले, बालरोग तज्ज्ञ आणि राज्य बाल कोरोना कृती दलाचे सदस्य.

लहान मुलांना शक्यतो कफ सिरप देत नाही. औषधाचा फायदा आणि त्याचे दुष्परिणाम या दोघांची तुलना केली तर लहान मुलांना औषध देऊ नये. तसेच दिवसातून एखाद्या मुलास १५-२० वेळा खोकला येत असेल तर कफ सिरप देऊ नये. एखाद्या मुलास तासाभरात ५०- ६० वेळा खोकला येत असेल तर त्यास क्वचितप्रसंगी कफ सिरप देऊन त्याला काही आराम पडतोय का, हे पाहण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही; मात्र त्या आजाराची तेवढी तीव्रता आहे की नाही हे तपासले पाहिजे. डॉक्टरांनी योग्य निदान करून मग निर्णय घ्यावा.- डॉ. राजेश चोखणी, अखिल भारतीय बालरोग तज्ज्ञांच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष.

टॅग्स :Healthआरोग्यkidsलहान मुलं