हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकला अशा प्रकारचे त्रास होण्याची शक्यता असते. शिवाय सतत आजारी पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढीसाठी आणि शरीर उबदार राहण्यासाठी योग्य आहाराची या दिवसांत अत्यंत आवश्यकता असते. आपल्याकडे प्रत्येक ऋतुत बहुतेक वेळा चपाती जास्त प्रमाणात खाल्ली जाते. याऐवजी ऋतुमानानुसार पौष्टिक घटक असलेल्या पिठाच्या भाकऱ्या खाणे थंड हवामानात फायदेशीर ठरते. या भाकऱ्या चविष्ट असतातच शिवाय यामुळे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
बाजरीची भाकरीफायबर आणि पोटॅशियचा उत्तम स्त्रोत असलेली बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसांत खावी. यामुळे पचनक्रियेतील अडथळे दूर होतात शिवाय वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाी आणि शरीराची शक्ती भरून काढण्यासाठी बाजरीची बाकरी गुणकारी आहे. बाजरीची भाकरी खाल्लयाने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.
ज्वारीची भाकरीज्वारीच्या भाकरीमुळे पचन सुधारते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ज्वारीची भाकरी उपयुक्त आहे. ह्रदयविकार असलेल्यांकरिता ज्वारीच्या पिठाची भाकरी खाणे फायदेशीर आहे. आहारात या भाकरीचा समावेश केल्याने शरीराला ऊर्जा आणि शक्ती मिळते.
मक्याची भाकरीहिवाळ्यात मक्याची भाकरी खाल्ल्यास बरेच फायदे होतात. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. जीवनसत्त्व अ, बी, ई आणि लोह, मँगनीज, तांबे, झिंक, सेलेनियम, पोटॅशियम ही खनिजे असतात. त्यामुळे शरीर निरोगी राहते. शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासाठीही ही भाकरी खाल्ल्याने मदत होते. हिवाळ्यात चार चपात्या खाणे हे मक्याच्या दोन भाकऱ्या खाण्याच्या बरोबरीचे आहे. या भाकरीमुळे शरीर उबदार राहते.