कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी गेल्या १० ते ११ महिन्यांपासून संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहे. कोरोनाची लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी भारतासह अनेक देशांच्या सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. फायजर इंक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानंतर आता हैदराबादमधील फार्मास्युटिकल कंपनी भारत बायोटेकनेही कोरोना लसीच्या आपत्कालीन स्थितीतील वापरासाठी परवानगी मागितली आहे.
भारत बायोटेकने केंद्रीय औषधी नियामक मंडळाकडे या लसीच्या परवानगीसाठी निवेदन दिलं आहे. भारत बायोटेक ही लसीसाठी परवानगी मागणारी तिसरी कंपनी आहे. देशभरातील लसीच्या चाचण्यांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर कंपनीचा भर होता . कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्ट्रेनमधून तयार केली जाणारी ही लस आहे. २०२१ च्या सुरूवातीच्या तीन महिन्यात ही लस भारतातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार, अशी माहिती भारत बायोटेककडून देण्यात आली होती. आता केंद्र सरकारकडून कोणत्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
कोणत्या लसीला सगळ्यात आधी परवानगी मिळणार?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्या सहयोगाने भारतात तयार केली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चार डिसेंबरला एक सर्वपक्षिय बैठक घेतली होती. या बैठकीत कोरोनाची लस काही आठवड्यात तयार उपलब्ध होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी फायजरने भारतील केंद्रीय औषधी नियामक मंडळाकडून लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली होती. याआधीही या कंपनीला ब्रिटन आणि बहरिनमध्ये या प्रकारची परवानगी मिळाली होती.
आनंदाची बातमी! 'या' देशात आजपासून सामान्यांना मिळणार कोरोनाची लस; भारतातही तयारीला सुरूवात
दोन विदेशी एक स्वदेशी कंपनीने लसीच्या वापरासाठी निवेदन दिलं आहे. भारत बायोटेक, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया आणि फायजरच्या लसीच्या आपत्कालीन वापराच्या निवेदनांवर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) विशेषज्ञ समितीद्वारे विचार केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे मुल्यांकन केल्यानंतर लसीला परवानगी देण्यास विचार केला जाईल. जुलैपर्यंत कसे तयार होणार ६० कोटी लसीचे डोस?; 'या' ४ लसींनी दाखवला आशेचा किरण
सीरमने Covishield लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मागितली परवानगी
दरम्यान सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लस "कोविशील्ड" (Covishield) च्या आपत्कालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. असा अर्ज करणारी ही स्वदेशी पहिली लस होती. सीरम संस्थेला परवानगी मिळाली तर भारतातील ही पहिली स्वदेशी लस ठरू शकेल. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांचं हित अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात दिली होती.