कोरोना झाल्यानंतर अनेकांना मानसिक तसंच शारीरिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. कोरोनापेक्षा जास्त कोरोनानंतरचा त्रास लोकांना जास्त त्रासदायक वाटत आहे. कोरोनाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये (Bihar) कोरोना झालेल्या डॉक्टराने आत्महत्या (Doctor sucide after corona infection) केली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ पसरली आहे.
संक्रमणामुळे बिहारच्या गिद्धौरमधील सार्वजिनिक आरोग्य केंद्रातील ६३ वर्षांचे डॉ. रामस्वरूप चौधरी यांनी मंगळवारी आत्महत्या केली आहे. डॉ. रामस्वरूप हे मूळचे सिंघपूरच गावचे होते. गेल्या सहा वर्षांपासून ते गिद्धौरच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी त्यांना कोविड केअर सेंटरची जबाबदारी देण्यात आली. याचदरम्यान त्यांना कोरोना झाला. तेव्हापासून तेव्हा पासून त्यांची मनस्थिती फारशी ठिक नव्हती. कारण कोरोना त्यांना त्रासाचा सामना करावा लागत होता.
आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा
यासंबंधी अधिक माहिती दैनिक भास्करनं दिले आहे. रामस्वरूप यांनी मंगळवारी काही लोकांसह फोनवरून चर्चा केली. त्यानंतर नाष्ता करून तयार होण्यासाठी आपल्या खोलीकडे निघाले. पण खोलीबाहेर मात्र आलेच नाहीत. डॉक्टराची पत्नी आणि मुलांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला पण तो आतून बंद होता. दरवाजा तोडल्यानंतर त्यांचं शरीर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळलं.
Diabetes symptoms : लगेचच तपासून घ्या 'ब्लड शुगर लेव्हल', जर लघवीच्या रंगात झाला असेल 'असा' बदल
रामस्वरूप यांच्याजवळ एक सुसाइड नोट सापडली. त्यात लिहिलं होतं, कोरोना झाल्यानंतर माझी स्मृती काम करत नाही आहे, झोपही लागत नाही, वेड लागल्यासारखं वाटतं, त्यामुळे मी आत्मअत्या करत आहे, दरम्यान त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठव असून पोलिस पुढील तपास करत आहेत.