कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नसताना आणखी एक मोठी समस्या समोर आली आहे. ती आहे बर्ड फ्लू. हा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक आहे. कारण याने संक्रमित लोकांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. तर कोरोनाने संक्रमित लोकांमध्ये मृत्यूचा दर हा ३ टक्के आहे. त्यामुळेच बर्ड फ्लूबाबत देशातील काही राज अलर्ट झाले आहेत. भारत सरकारनुसार, राजस्थान, मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश, केरळमध्ये बर्ड फ्लू आला आहे. अशात केंद्र सरकारकडून एक कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. ज्याव्दारे देशात येत असलेल्या या केसेसवर लक्ष ठेवलं जाईल.
Aajtak.in च्या एका रिपोर्टनुसार, बर्ड हा एक एवियन इन्फ्लूएंजा हा फार संक्रामक आणि कोरोनाच्या तुलनेत अधिक घातक सांगितला जातो. इन्फ्लूएंजा चे ११ व्हायरस आहे जे मनुष्यांना संक्रमित करू शकतात. पण यातील केवळ पाच असे आहेत जे मनुष्यांसाठी जीवघेणे ठरू शकतात. ते आहेत H5N1, H7N3, H7N7, H7N9 आणि H9N2. बर्ड फ्लू पक्ष्यांच्या माध्यमातून मनुष्यांमध्ये पसरतो. या व्हायरसना HPAI (Highly Pathogenic Avian Influenza) असं म्हटलं जातं. यातील सर्वाधिक घातक आहे H5N1 बर्ड फ्लू व्हायरस.
बर्ड फ्लू याआधी जगभरात चार वेळा मोठ्या प्रमाणात पसरला होता. इतकेच काय तर ६० पेक्षा जास्त देशात महामारीचं चित्र होतं. २००३ पासून हा व्हायरस सतत कोणत्या ना कोणत्या देशात पसरत आहे. H5N1 बर्ड फ्लू व्हायरस हा सर्वात घातक यासाठी आहे कारण याने संक्रमित लोकांपैकी अर्ध्यांचा मृत्यू होतो. २००३ पासून आतापर्यंत H5N1 बर्ड फ्लू व्हायरसने संक्रमित मनुष्यांच्या मृत्यूबाबत सांगायचं तर एकूण ८६१ लोक संक्रमित झाले आहेत. यातील ४५५ लोक मृत्यूमुखी पडले. म्हणजे मृत्यू दर हा ५२.८ टक्के आहे.
H5N1 बर्ड फ्लू व्हायरस जास्तकरून दक्षिण-पूर्ण आशियात आढळतो. पण जगातल्या सर्वात देशात याची लागण झाली आहे. २००८ मध्ये या व्हायरसने चीन, इजिप्त, इंडोनेशिया, पाकिस्तान आणि व्हिएतनाम या देशात ११ वेळा संक्रमण पसरलं आहे. या व्हायरसवर काही वॅक्सीनही तयार केल्या आहेत. ज्या ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा या देशांनी त्यांच्याकडे जमा करून ठेवल्या आहेत.
H5N1 बर्ड फ्लू व्हायरसची सर्वात मोठी समस्या ही आहे की, हा व्हायरस हवेतून पसरतो. सोबतच वेगाने म्यूटेशनही करतो. मनुष्यातून मनुष्याला संक्रमण झाल्याच्या केसेस कमी आढळल्या. पण पक्ष्यांद्वारे आणि जनावरांव्दारे मनुष्यांना संक्रमण नक्की होतं. WHO नुसार, २००८ मध्ये पसरलेल्या H5N1 बर्ड फ्लू व्हायरसमुळे एकूण संक्रमित लोकांपैकी ६० टक्के लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
H5N1 व्हायरसने सर्वातआधी १९५९ मध्ये स्कॉटलॅंडमध्ये कोंबड्यांना मारले होते. त्यानंतर इंग्लंडमध्ये १९९१ मध्ये टर्की पक्ष्यांना मारलं. पण तेव्हा हा मनुष्यांमध्ये पसरत नव्हता. या व्हायरसने मनुष्यांना सर्वातआधी १९९७ मध्ये संक्रमित केलं. हे झालं होतं चीनच्या गुआंगडोंगमध्ये. त्यानंतर हॉंगकॉंगमध्ये १८ लोक संक्रमित झाले होते. यातील ६ लोकांचा मृत्यू झाला होता.
तज्ज्ञ सांगतात की, H5N1 बर्ड फ्लू व्हायरसचा एशियन व्हायरस फार संक्रामक आणि जीवघेणा आहे. जेव्हा हा पसरण्याची बातमी समोर येते तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सतर्कता वाढवली जाते. H5N1 व्हायरसचे दोन स्ट्रेन आहेत. पहिला नॉर्थ अअमेरिकन Low pathogenic avian influenza H5N1 (LPAI H5N1) आणि दुसरा एशियन लीनिएज Asian lineage HPAI A(H5N1). एशियन लीनिएज जास्त घातक आहे.