पवित्रा कस्तुरेकाळा रंग अनेकांना आवडत, अनेकांना खूप आवडतो. त्यात आता पावसाळा. कुंद हवा. डल वातावरण. त्यात कुठं काळे कपडे घालणार? अजून उदासबिदास वाटेल असा एक समज आहेत. पावसाळ्यात ब्राईट, उष्ण रगांचे कपडे घालावेत असं म्हणतात. ते खरंही आहे. पण म्हणून काळा रंग वापरुच नये असं काही आहे का? तर तसंही नाही, कारण यंदा नुकत्याच सुरु झालेल्या पावसाळ्यातही काळ्या रंगाची मिक्स मॅच जादू बहार आणू शकेल. कारण काळा हा आता आॅलटाईम फेवरिट कलर मानला जातो. कॉण्ट्रास्ट मॅचिंगच्या काळात तर काळ्याचं महत्व अधिकच वाढतं आहे. स्ट्रीट फॅशन ते सेलिब्रिटी फॅशन अशा सर्व प्लॅटफॉर्मवर सध्या काळ्या रंगाची चलती आहे. एवढंच कशाला अलिकडे रंगीत छत्र्यांपेक्षाही काळ्या छत्र्या पुन्हा फॅशनेबल होत आहेत, त्यांना एक पर्सनल टच दिला जातो आहे. मुख्य म्हणजे आपण फॅशन ढ आहोत असं वाटत असलं तरी कशाहीबरोबर कधीही ब्लॅक रंग वापरता येतोच. त्यामुळे पावसाळी फॅशन विषयी आपलं घोर अज्ञान असलं तरी यंदा बिन्धास्त काळ्या रंगाचा वापर करा, ते हीट आहेच.
३) लेअरचा एक ट्रेण्ड आहे. पावसाळ्यात अनेकांना लेअर करणं आवडतं. शर्ट, शर्टवर श्रग, जॅकेट, लॉँग जॅकेट, स्ट्रोल असं काहीबाही लेअर केलं जातं. पण ते करायचं तर रंगसंगती उत्तम जमायला हवी. पर्याय काय, काळ्या रंगाचे एकदोन कपडे घाला, जमून येईल लेअर परफेक्ट.४) डाऊट असेल की फॅशन काय? संध्याकाळी काय घालतात, रात्री काय, फॉर्मल काय? अशावेळी फार विचार न करता काळ्या रंगाचे कपडे घालणं उत्तम.
५) ऋतू बदल झाला की अमूक टेक्शचरचे, अमूक रंगांचे, प्रिण्टचे कपडे बाद होतात असा एक फॅशन ट्रेण्ड आहे. दर ऋतूत कुठून आणायचे पैसे नव्या खरेदीसाठी? त्यापेक्षा काळ्या रंगाचे चार-दोन उत्तम कपडे घेवून ठेवावेत. जॅकेट, जिन्स, श्रग, शर्ट. तेच आलटून पालटून सर्व ऋतूत घालणं योग्य.