शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
3
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
4
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
5
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
6
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
7
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
8
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
9
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
10
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
11
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
12
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
13
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
15
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
16
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
17
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
18
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
19
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
20
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार

Black Fungus: तुमच्या किचन अन् फ्रिजमधूनही पसरतो ब्लॅक फंगस?; जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 9:39 AM

Black Fungus: ब्लॅक फंगसबद्दल विविध पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; म्युकरमायकोसिसबद्दल वेगवेगळे दावे

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज कोरोनाचे ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा २ लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र त्याचवेळी ब्लॅक फंगसचा (mucormycosis) धोका वाढत आहे. म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसबद्दल सोशल मीडियावर विविध प्रकारची माहिती शेअर केली जात आहे.कोरोना मृत्यूंमागचं 'खरं' कारण समोर; ६०% रुग्णांच्या मृत्यूबद्दल धक्कादायक माहिती उघडब्लॅक फंगस कसा पसरतो, त्याच्यापासून बचाव करण्यासाठीचे उपाय काय यासंदर्भात सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट व्हायरल झाली आहे. कांद्यांवर दिसणारा काळा थर आणि फ्रिजमध्ये दिसणारा काळा थर ब्लॅक फंगस असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी यात कोणतीच तथ्य नसल्याचं सांगितलं. कांद्यावरील किंवा फ्रिजमधील काळ्या थराचा ब्लॅक फंगसच्या आजाराशी काहीही संबंध नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.ऑक्सिजनची पातळी ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ‘ती’ परतलीफ्रिजमध्ये जमा होणारा काळा थर, कांद्यावर दिसून येणारा काळा थर आणि ब्लॅक फंगस पूर्णपणे वेगळे आहेत. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, mucormycosis एक ब्लॅक फंगस नाही आणि ब्लॅक फंगसचं नावच मुळात चुकीचं आहे. कारण ब्लॅक फंगस काळ्या रंगाची नसते. ब्लॅक फंगसची लागण झाल्यावर शरीरातील रक्तपुरवठा थांबतो. त्यामुळे त्वचेवर काळ्या रंगाचे डाग येतात. त्यामुळे याला ब्लॅक फंगस म्हटलं जात असावं. याचं खरं नाव mucormycosis आहे.स्टेरॉईड्स हे mucormycosisचा धोका वाढण्यामागचं प्रमुख कारण असल्याचं डॉ. गुलेरियांनी सांगितलं. 'एखादी व्यक्ती बऱ्याच कालावधीपासून स्टेरॉईड्स घेत असेल किंवा त्या व्यक्तीला मधुमेहासारखा आजार असल्यास तिला फंगल इंफेक्शनचा धोका असतो. त्यामुळे अशा व्यक्तींना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. त्यांनी मधुमेह नियंत्रणात ठेवायला हवा. या आजाराला रोखण्यासाठी वेगानं काम करण्याची गरज आहे,' असं डॉक्टर म्हणाले.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या