शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

Black Fungus vs White Fungus: ब्लॅक आणि व्हाइट फंगसमध्ये काय फरक आहे? शरीराच्या कोणत्या अवयवांचं होतं याने नुकसान?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 2:00 PM

White Fungus- Black Fungus : अखेर ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसमध्ये अंतर काय आहे? व्हाइट फंगस ब्लॅक फंगसपेक्षा किती घातक आहे? चला जाणून घेऊन...

कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ब्लॅक फंगस (Black Fungus) आणि व्हाइट फंगसने(White Fungus) लोकांच चिंता वाढवली आहे. या दोन्ही समस्या कोरोनापेक्षाही जास्त जीवघेण्या मानल्या जात आहेत. अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसला महामारी घोषित केलं आहे. मात्र, व्हाइट फंगसही महामारीपेक्षा कमी नाही. अखेर ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसमध्ये (Difference between black fungus and white fungus) अंतर काय आहे? व्हाइट फंगस ब्लॅक फंगसपेक्षा किती घातक आहे? चला जाणून घेऊन...

ब्लॅंक फंगससोबतच आता व्हाइट फंगसच्या केसेसही वाढत आहेत. पण अजूनही याबाबत फार जास्त माहिती उपलब्ध नाही. जसे की, आतापर्यंत हे समजू शकलं नाही की, व्हाइट फंगसला कोणती गोष्ट इतकी घातक बनवते?पटणा येथील एनेस्थिसिओलॉजिस्ट डॉक्टर शरद सांगतात की, 'अनेक ठिकाणी व्हाइट फंगसच्या केसेस समोर आल्या आहेत. हे लोक कॅनडिडाबाबत बोलत आहेत. कॅनडिडा आधीही होत होता. कॅन्सर, डायबिटीसची औषधे घेतल्याने किंवा स्टेरॉइडमुळे ज्यांची इम्यूनिटी घटली, अशा लोकांमध्ये फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त राहतो. व्हाइट फंगसवर उपचार सहजपणे होतात. तरी लोकांनी जागरूक राहण्याची गरज आहे'. (हे पण वाचा : Black Fungus: तुम्ही 'या' तीन गोष्टी करता? मग तुम्हाला 'ब्लॅक फंगस'चा अधिक धोका)

काय आहे ब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसमध्ये फरक?

आतापर्यंत जे समजलं त्यानुसार ब्लॅक फंगस कोरोना अशा रूग्णांमध्ये आढळून आलं, ज्यांना जास्त स्टेरॉइड दिलं गेलं. तर व्हाइट फंगसच्या केसेस अशा रूग्णांमध्ये संभावित आहे ज्यांना कोरोना झालेला नाही. ब्लॅक फंगस डोळे आणि मेंदूला सर्वात जास्त प्रभावित करतो. तर व्हाइट फंगस सहजपणे लंग्स, किडनी, आतड्या, पोट आणि नखांना प्रभावित करतं.

त्यासोबतच ब्लॅक फंगस जास्त डेथ रेटसाठी ओळखला जातो. या आजाराने डेथ रेट ५० टक्क्यााच्या आसपास आहे. म्हणजे प्रत्येक दोनपैकी एका व्यक्तीचा जीव धोक्यात आहे. पण व्हाइट फंगसमध्ये डेथ रेटबाबत अजून काहीच आकडेवारी उपलब्ध नाही. (हे पण वाचा : Mucormycosis: म्युकरमायकोसिसचा पुरुषांना अधिक धोका, देशभरातील तज्ज्ञांचा अभ्यास अहवाल )

वाराणसीचे विट्रो रेटिना सर्जन डॉ. क्षितिज आदित्य म्हणाले की, 'हा काही नवीन आजार नाही. कारण ज्या लोकांची इम्यूनिटी फार जास्त कमी असते. त्यांना ही समस्या होऊ शकते. ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिस एक वेगळ्या प्रजातीचा फंगस आहे. पण तोही अशाच रूग्णांना होत आहे ज्यांची इम्यूनिटी कमी आहे. ब्लॅक फंगस नाकातून शरीरात जातं. डोळे आणि मेंदूला प्रभावित करतं. पण व्हाइट फंगस म्हणजे कॅनडिडा जर एकदा रक्तात आलं तर ते रक्ताच्या माध्यमातून ब्रेन, हार्ट, किडनी हाडांसहीत सर्व अवयवांमध्ये पसरतं. त्यामुळे हे फंगस फारच  घातक मानलं जातं'.

डॉ. हनी साल्वा सांगतात की, 'व्हाइट फंगसही जीवघेणा आहे जर ते तुमच्या रक्तात किंवा लंग्समध्ये असेल. या आजाराचा उपचारही होतो. याला व्हाइट फंगस म्हणतात कारण जेव्हा याला डिटेक्ट करण्यासाठी टेस्ट करतात तेव्हा यात व्हाइट कलरचा ग्रोथ आढळून येतो. ब्लॅंक फंगसप्रमाणेच व्हाइट फंगसही कुठेही होऊ शकतं. पण यावर उपचार वेगळा आहे'.

ब्लॅंक फंगसवर उपचार शक्य आहे का?

एक्सपर्ट सांगतात की, व्हाइट फंगसच्या केसमध्ये चांगल्या स्कीन स्पेशालिस्टकडून सल्ला घेऊन हा आजारा बरा केला जाऊ शकतो. व्हाइट फंगसच्या सध्या जास्त केसेस समोर आल्या नाहीत. पण एक्सपर्ट सांगतात की, ब्लॅक फंगसप्रमाणे हेही जास्त वाढू शकतं. 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या