(Image Credit : relrus.ru)
आपल्या शरीरात ऑक्सिजन, हार्मोन, क्लोटिंग फॅक्टर्स, शुगर, फॅट्स आणि रोगप्रतिकार शक्ती यांसारखी तत्व पोहोचवण्याचं काम रक्त करतं. रक्त अशुद्ध झाल्यानंतर शरीरावर पुरळ, पिंपल्स येतात. तसेच लठ्ठपणाची समस्या उद्भवते. एवढचं नाहीतर ताप, हृदयाचे ठोके वाढणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
शरीरामधील रक्ताचं काम ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडसारखी तत्व फुफ्फुसं आणि शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचवणं आहे. तसेच रक्त पचन तंत्रातून पोषक तत्व शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचवतं.
रक्तामध्ये व्हाइट ब्लड सेल्स असतात. जे शरीरातील आक्रमक सूक्ष्मजीवांना नष्ट करतात. तसेच रक्त शरीराची पीएच लेव्हल, तापमान आणि पाण्याची पातळीही नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.
दरम्यान, लिव्हर आणि किडन्या रक्त स्वच्छ करण्याचं काम करतात. परंतु, अनियमित डाएट आणि जीवनशैलीमुळे रक्त अशुद्ध होण्याची लक्षणं अनेकांमध्ये दिसून येतात. लोकमत न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, तुमच्या आहारा थोडे बदल करून तुम्ही तुमच्या शरीरातील अशुद्ध झालेले रक्त नैसर्गिकरित्या स्वच्छ करू शकता. तसेच विविध रोगांपासून बचाव करू शकता. त्यामुळे डाएटमध्ये या पदार्थांचा समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं.
1. ब्लू बेरिज
ब्लू बेरिजमध्ये अॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असून लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरतात. एका संशोधनानुसार, ब्लू बेरी लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ब्लू बेरीजचा सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. तुम्ही हे दही, दलिया या स्मूदीमध्ये एकत्र करू शकता.
2. क्रेनबेरी
क्रेनबेरी यूटीआयवर अत्यंत फायदेशीर ठरतं. यातील पोषक तत्व मूत्रमार्गातील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी आणि किडनीचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. क्रेनबेरीचा आहारात समावेश करण्यासाठी दलिया, स्मूदी किंवा सलाडच्या रूपात करू शकता.
3. लसूण
जास्तीत जास्त भारतीय घरांमध्ये जेवण तयार करण्यासाठी लसूणाचा वापर करण्यात येतो. पण लसूण शिजवून खाल्यावर जेवढा फायदा होत नाही, जेवढा तो कच्चा खाल्यावर होतो. त्यामुळे आपल्या दररोजच्या जेवणामध्ये थोडासा कच्चा लसूण एकत्र करा.
4. लिंबाचा रस
दररोज लिंबाचा रस गरम पाण्यात एकत्र करून प्यायल्याने रक्त स्वच्छ होण्यास मदत होते. तुम्ही शक्य असेल तर कोऱ्या चहामध्ये लिंबाचा रस एकत्र करून त्याचं सेवन करू शकता. यामुळे फक्त रक्त शुद्ध होण्यास मदत होत नाहीतर शरीरातून सर्व विषारी तत्व दूर होण्यासही मदत होते.
5. आलं
आल्याचे रक्त शुद्ध करण्यासोबतच इतरही अनेक फायदे होतात. आलं कच्च खाल्याने शरीराला जास्त फायदे होतात. आल्याचा वापर तुम्ही चहासोबत किंवा जेवणामध्ये करू शकता. रक्तातीत अशुद्ध तत्व दूर करण्यासाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आलं मदत करतं.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)