Blood Clotting Sign: शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणं एकीकडे आरोग्यासाठी फायदेशीरही असतात. तर दुसरीकडे या गाठी जीवघेण्या ठरू शकतात. रक्ताच्या गाठी त्वचा कापली गेल्यावर किंवा जखम झाल्यावर शरीरातून जास्त रक्त वाहण्यापासून रोखतात. पण शरीरात जास्त प्रमाणात रक्ताच्या गाठी तयार होत असतील तर या घातकही ठरू शकतात.
सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅंन्ड प्रीवेंशननुसार, दरवर्षी शरीरात रक्ताच्या गाठी तयार झाल्याने कमीत कमी 1 लाख लोकांचा जीव जातो. इतकंच काय तर कॅन्सरने पीडित लोकांच्या मृत्यूचंही हे एक मुख्य कारण असतं. कोणत्याही व्यक्तीला शरीरात रक्त गोठण्याची समस्या होऊ शकते. अशात वेळीच तुम्ही याच्या संकेताना ओळखायला हवं. जेणेकरून मृत्यूचा धोका कमी केला जाऊ शकतो.
रक्त गोठल्याने जाऊ शकतो जीव
ब्लड क्लॉटिंग एक सायलेंट किलरचं काम करतं. ज्यामुळे अनेक गंभीर मेडिकल किंडशन निर्माण होऊ शकतात. धूम्रपान, हाय ब्लड प्रेशर आणि काही औषधे जसे की, एस्ट्रोजन रक्त गोठण्याचा धोका अनेक पटीने वाढवतात. रक्ताच्या गोठण्याच्या लक्षणांना जाणून घेतल्यावर पल्मोनरी एम्बोलिज्म किंवा स्ट्रोक येण्याआधी तुमचा जीव वाचवला जाऊ शकतो.
ब्लड क्लॉटिंगची लक्षणे
रक्ताच्या गाठी सामान्यपणे पायांमध्ये जमा होतात. ज्यामुळे पायांमधील कोशिकांपर्यंत ऑक्सिजन योग्यप्रकारे पोहचत नाही. रक्ताच्या गाठी कोणतेही विशेष संकेत देत नाहीत. ज्यामुळे याकडे कुणाचं फार लक्ष जात नाही. रक्ताच्या गाठी ज्या कोणतेही लक्षणे दाखवत नाहीत, त्या जास्त धोकादायक असतात. कारण यांवर वेळेवर उपचार होऊ शकत नाही. जे फुप्फुसं किंवा मेंदूमध्ये समस्या निर्माण करू शकतात.
ब्लड क्लॉटिंगचे संकेत
Webmd नुसार, मध्यम किंवा हाय हालचालीनंतर येणारा थकवा, घाम, श्वासाची समस्या किंवा चक्कर येणे याकडे कुणीही सामान्यपणे दुर्लक्ष करतं. जर ही लक्षणे तशीच कायम राहिली किंवा आराम व हलकी हालचाल केल्यानेही दिसत असतील तर या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
सूज, वेदना, त्वचेच्या रंगात बदल
जर तुमच्या त्वचेवर जखम झाली असेल, त्वचेवर सूज आली असेल तर हे ब्लड क्लॉटिंगचे संकेत असू शकतात. त्वचेचा रंग बदलला असेल तर याकडेही दुर्लक्ष करू नका. नसा जास्त डार्क दिसत असतील तर हा ब्लड क्लॉटिंगचा संकेत असू शकतो. असे काही संकेत दिसत असतील तर वेळीच सावध व्हा.
रक्ताच्या गाठी झाल्याने येते कमजोरी, मळमळ
चरबीमुळे किंवा शरीरातील विषारी पदार्थांमुळे मेंदूच्या नसांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात. हे डोक्यावर जखम झाल्याने किंवा शारीरिक इजा झाल्यानेही होऊ शकतं. याने मेंदूवर खोलवर प्रभाव पडतो. यामुळे मेंदूपर्यंत योग्यप्रमाणात ऑक्सिजन पोहोचत नाही. ज्यामुळे तुम्हाला चक्कर येऊ लागते. तुम्ही भ्रमीत होऊ शकता. अशात काही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.