जगात सध्या हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढतेय. सध्याची जीवनशैली, खाण्याच्या आणि जेवणाच्या अनियमित वेळा, फास्टफूड त्यामुळे वाढते वजन ही सर्व कारणे हृदयाच्या विविध विकारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. असाच एक हृदयाशी संबधित आजार म्हणजे डिसलीपिडेमिया. या आजारात तुमच्या शरीरात लिपिडचा स्तर किती आहे हे तपासले जाते. त्यावरुन रोगाचे निदान केले जाते, असे हृदयरोग तज्ज्ञ आशिष श्रीवास्तव यांनी ओन्लीमायहेल्थशी बोलताना सांगितले.
रक्तातील लिपिड म्हणजे काय?रक्तात कॉलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लेसिराईड्स आदी फॅटशी संबधित घटक असणारे घटक म्हणजे लिपिड. लिपिडमध्ये वाढ होणे म्हणजे रक्तात या घटकांमध्ये वाढ होणे व चांगले कॉलेस्ट्रॉल कमी होणे. अनेकदा हे हृदयाच्या विकारांना कारणीभूत ठरतं. यावर जीवनशैलीत योग्य बदल करून मात करता येऊ शकते.
याची लक्षणेबहुतेक लोकांना डिसलीपेडमिया झाला आहे हे लक्षातच येत नाही. हा आजार हृदयाशी संबंधित इतर आजारांनाही आमंत्रण देतो त्यामुळे याची लक्षणे जाणून घेतलीच पाहिजे.-पायांना सूज येणे, छातीत दुखणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मान आणि पाठ दुखणे, झोप न येणे, थकवा जाणवणे, अपचन, चक्कर येणे, गळ्यातील नसांना सुज येणे, घाबरल्यासारखे होणे, उल्टी आल्यासारखे वाटणे.
डिसलीपेडमियाची कारणेप्राथमिक कारणहा आजार बहुतांश: अनुवंशिक असतो. समजा आईवडिलांना हा आजार असेल तर मुलाला आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर हा आजार तरुण वयात होतो. वाईट कॉलेस्ट्ऱॉल वाढते आणि चांगले कमी होते.
अन्य कारणे-व्यसनाधीनता, लठ्ठपणा, टाईप २ डायबेचटीज, ट्रांस आणि सॅच्युरेटेड फॅटचे अधिक सेवन, लीवरचे आजार, पॉलिस्टिक ओवरी सिंड्रोम, कुशिंग सिंड्रोम
उपायडॉक्टर या आजारावर उपाय करताना रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे वजन कमी करण्यावर भर देतात. यासाठी ते औषधं देतात तसेच जीवनशैलीतही बदल सुचवतात. जसे तेलकट- फॅट आणि कॉलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ कमी खाणे, वजन जास्त असल्यास ते कमी करणे, व्यसनांपासून दूर राहणे, मानसिक ताण न घेणे, पुरेशी झोप घेणे, जास्तीतजास्त पाणी पिणे अशा गोष्टी सुचवल्या जातात.