- मयूर पठाडेकोणत्याही गोष्टीचं तरुणपणांत काहीच वाटत नाही. हिंमत असते, रिस्क घेण्याची तयारी असते, कोणत्याही गोष्टीला हिंमतीनं सामोरं जाण्याची जिद्द असते.. पण ही हिंमत आणि जिद्द नको तिथे दाखवली तर नंतरच्या काळात त्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतात.कॅलिफोर्निया येथील शास्त्रज्ञांनी नुकतंच एक संशोधन केलं. हे संशोधन खूपच महत्त्वाचं मानलं जातं. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी आणि विशेषत: महिलांसाठी हे संशोधन खूपच उपयोगी आहे.शास्त्रज्ञांनी मध्यम वयातील म्हणजे तिशीच्या पुढील जवळपास साडेसात हजार स्त्री पुरुषांचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं, ज्या महिलांना चाळीशीच्या दरम्यान हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर नंतरच्या आयुष्यात त्यांना विस्मृतीचा म्हणजेच डिमेन्शियाचा आजार होऊ शकतो.चाळीशीतील ज्या महिलांना हा त्रास नाही किंवा ज्या नॉर्मल आहेत, त्यांच्यापेक्षा हाय ब्लड प्रेशर असलेल्या महिलांना डिमेन्शियाचा धोका तब्बल ७५ टक्क्यांनी वाढतो असं शास्त्रज्ञांचं निरीक्षण आहे.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणताही आजार आपल्याला त्याची पूर्वसूचना देत असतो. त्याकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. एवढ्याशा गोष्टीनं काय होतं किंवा होईल बरं आपोआप.. असा जर आपला दृष्टिकोन असला तर मात्र नंतर मात्र त्या गोष्टींवर उपचार करणं तर कठीण होतंच, पण बºयाचदा काही गोष्टी हाताबाहेर जातात.त्यामुळे शास्त्रज्ञांचा सर्व पुरुष आणि महिलांना सल्ला आहे, तरुण वयातच, खरं तर लहान वयापासूनच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यांना चाळीशीत ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी वेळीच त्याकडे लक्ष देऊन उपचार घ्या.. नाहीतर नंतर तुम्हाला काहीच आठवणार नाही..
चाळीशीतील ब्लड प्रेशरमुळे नंतर होऊ शकतो स्मृतिभ्रंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 4:01 PM
पुरुषांच्या तुलनेत महिलांना मोठा धोका
ठळक मुद्देज्या महिलांना चाळीशीच्या दरम्यान हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर नंतरच्या आयुष्यात त्यांना विस्मृतीचा आजार होऊ शकतो.अशा महिलांना डिमेन्शियाचा धोका तब्बल ७५ टक्क्यांनी वाढतो.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोणताही आजार आपल्याला त्याची पूर्वसूचना देत असतो. त्याकडे अतिशय गांभीर्यानं बघण्याची गरज आहे.