(image credit- The health site.com)
कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार पसरला आहे. कोरोनाच्या भीतीने लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. साधा, ताप, सर्दी, खोकला असेल तरी कोरोनाची लागण झाली असावी अशी भीती सगळ्यांच्याच मनात असते. कोरोना काळात तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाता तेव्हा शरीरातील तापमान तपासूनच आत प्रवेश दिला जातो. सॅनिटायजर, मास्क असा सगळ्या सोयी पुरवल्या जातात. घरी सुद्धा अनेकजण तापमान चेक करतात किंवा शंका असल्यास दवाखान्यात जातात. पण त्यासाठी शरीरातील तापमान तपासण्याची योग्य पद्धत माहीत असायला हवी.
तोंडात, काखेत थर्मामीटर ठेवून तापमान तपासले जाते. पण शरीरातील तापमान पाहण्यासाठी शरीरातील इतर अवयवांचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. कान, डोकं, काखेद्वारे शरीरातील तापमान तपासता येऊ शकतं. काखेतून तापमान पाहण्याची पद्धत योग्य समजली जाते.
अंडरआर्म्सने तापमान कसे तपासाल
एका डिजिटल थर्मामीटरचा वापर अंडरआर्मचे तापमान मोजण्यासाठी करू शकता. त्यासाठी लिड असलेल्या थर्मामीटरचा वापर करू नका. कारण असा थर्मामीटर तुटल्यानंतर शरीरासाठी घातक ठरू शकतो. सगळ्यात आधी थर्मामीटर उघडून लहान मुलांचा हात वर उचलून आत थर्मामीटर घाला. त्याचे टोक हे हातांमध्ये दाबलं जाईल याची काळजी घ्या. नंतर हात खाली करा. त्यानंतर जवळपास १ मिनिट वाट पाहून थर्मामीटर काढून घ्या आणि तापमान तपासा. वापरून झाल्यानंतर थर्मामीटर स्वच्छ करून ठेवून द्या.
कानाने तापमान कसे तपासाल
कानाचे तापमान साधारणपणे शरीराच्या तापमानाच्या तुलनेत कमी असते. त्यासाठी तुम्हाल विशेष थर्मामीटरची आवश्यकता भासू शकते. डॉक्टराच्या सल्ल्यानुसार थर्मामीटरचे टोक साफ करून तपामान तपासू शकता. कानाच्या बाहेरील बाजूस हळूवारपणे थर्मामीटर लावून सावकाश खेचा. त्यानंतर थर्मामीटरवरील तापमान वाचण्याचे बटन दाबा. मग थर्मामीटर काढून तापमान वाचू शकता. डॉक्टरांकडून योग्य माहिती मिळवून तुम्ही थर्मामीटरने डोक्याचेही तापमान तपासू शकता.
दिलासादायक! भारतात तयार होणार कोरोनाचं सगळ्यात स्वस्त औषध; जाणून घ्या किंमत
कोरोनाशी लढण्यासाठी नैसर्गिकरित्या 'हर्ड इम्युनिटी' विकसित होणं अशक्य; तज्ज्ञांचा दावा