लिंबू सहसा प्रत्येकजण खात असतो. जेवणाची चव वाढवण्यापासून ते अन्न पचवण्यासाठी आणि उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. निरोगी राहण्यासाठी अनेकजण आपल्या आहारात लिंबू-पाण्याचा समावेश करतात. लिंबू-पाणी आरोग्यासाठी विशेषतः उन्हाळ्यात फायदेशीर आहे. या सर्वांशिवाय अनेकांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे उकळलेले लिंबू पाणी अनेक रोगांशी लढण्यासाठी प्रभावी ठरू (Boiled Lemon Water Benefits) शकते.
खरं तर, लिंबू हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी तसेच कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस आणि फोलेट अॅसिडचा एक चांगला स्रोत आहे. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, वजन कमी करण्यात आणि मुतखड्यावरही ते प्रभावी असल्याचे आढळले आहे. आज आपण उकडलेल्या लिंबू पाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
उकडलेले लिंबू पाणी कसे सेवन करावे -एका भांड्यात अर्धा लिंबू एक ग्लास पाण्यात उकळवा. साधारण पाच मिनिटे उकळल्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवा. हे पाणी तुम्ही मीठ किंवा मधाव्यतिरिक्त काहीही न घालता तुमच्या आवडीनुसार पिऊ शकता. रस पिळून सोबतच त्याची सालदेखील उकळून पिणं चागलं. या हेल्दी पेयाने तुम्ही दिवसाची सुरुवात करू शकता. मात्र, लक्षात असू दे की, लिंबाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्यास त्यामुळे त्वचेची अॅलर्जी आणि खाज सुटू शकते. त्यामुळे दररोज किती प्रमाणात लिंबाचा रस घेणे योग्य आहे, याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पिणं योग्य ठरेल.
लिंबू-पाणी उकळून पिण्याचे त्वचेला फायदे -लिंबू पाणी उकळून प्यायल्याने त्वचेतील बॅक्टेरिया कमी होतात. त्यामुळे चेहरा स्वच्छ आणि डागरहित दिसतो. व्हिटॅमिन सी समृद्ध असल्याने, उकळलेले लिंबू पाणी अँटी-ऑक्सिडंट म्हणून कार्य करते, ज्यामुळे त्वचेतील मुक्त रॅडिकल्स कमी होऊन त्वचा चमकते.
उच्च रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त -उकळलेले लिंबू पाण्याचे सेवन रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास देखील मदत करते. यामध्ये असलेले कॅल्शियम आणि पोटॅशियम उच्च रक्तदाब सामान्य पातळीवर आणण्याचे काम करतात. यासाठी आपल्याला हवे असल्यास लिंबाचा रस मिसळून ब्लॅक टी देखील पिऊ शकता.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते -उकळलेले लिंबू पाणी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. व्हायरल इन्फेक्शन सारख्या आजारांशी लढण्यासाठी हे प्रभावी आहे. तसेच, यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रभावी -उकळलेले लिंबू पाणी वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. लिंबू पाणी मधासोबत सेवन केल्याने शरीरातील चरबी झपाट्याने कमी होते आणि शरीर हायड्रेटही राहते.
पचनक्रिया सुधारते -अनेक वेळा असंतुलित आहार घेऊनही पचनक्रिया बिघडते आणि बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, पोटदुखी अशा अनेक समस्या पाहायला मिळतात. अशा परिस्थितीत रोज सकाळी रिकाम्या पोटी उकळलेले लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.
मुतखड्यावर गुणकारी -लिंबू पाणी प्यायल्याने मुतखड्यामध्ये कॅल्शियम ऑक्सलेटचा प्रभाव कमी होतो. हे ऑक्सलेट हार्ड डिपॉझिटच्या स्वरूपात उद्भवते, ज्यामुळे वेदना, मळमळ आणि उलट्या होतात.