Drinking Boiled Water : असह्य उष्णतेनंतर पावसाच्या खूप दिलासा देणाऱ्या असतात. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस आल्यावर सगळ्यांनाच चांगलं वाटतं, पण हेही खरं आहे की, पाऊस आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येत असतो. अशात दुषित पाण्यापासून बचाव करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात.
पावसाच्या दिवसांमध्ये पाणी उकडून पिण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना गंभीर आजारांचा धोका होतो. पण याचं कारण अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊ...
पाण्यात घातक तत्व
नळांमध्ये येणारं पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. पण हे पाणी लोकांच्या घरात पोहोचेपर्यंत त्यात अनेक घातक विषाणू मिसळतात. नळातील पाण्यामध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कणही आढळतात. जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
काय सांगतो रिसर्च
चीनच्या जिनान यूनिवर्सिटी अभ्यासकांना एका रिसर्चमध्ये आढळलं की, नळातून येणाऱ्या पाण्यामध्ये मायक्रोप्लास्टिक जास्त असतं. नळाच्या पाण्यात एन-मिथाइल-2-पायरोलिडोन नावाचं तत्व असतं. हे मायक्रोप्लास्टिकचे कण पोटात पोहोचून गंभीर आजारांचा धोका वाढवतात. जर पाणी शुद्ध केलं गेलं किंवा काही मिनिटांसाठी उकडून घेतलं तर याने मायक्रोप्लास्टिकचा प्रभाव ८०% कमी केला जाऊ शकतो.
पाणी स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
पाणी शुद्ध करण्यासाठी सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे ते उकडून घ्यावं. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार पाणी ५ मिनिटांसाठी जरी उकडलं तरी शुद्ध होऊ शकतं. पावसाळ्यात वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे या दिवसात पाणी उकडूनच प्यावे.
पाणी उकडून पिण्याचे फायदे
पाणी उकडून प्यायल्याने डायजेस्टिव सिस्टीम चांगलं काम करतं. तसेच कोमट पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. पावसात भिजल्यावर जर तुम्हा सर्दी-खोकला, घशात खवखव होत असेल तर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.