लवकरच हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. म्हणजे सध्या जे वातावरण आहे त्यात ना जास्त गरमी आहे ना जास्त थंडी. मुंबईमध्ये भलेही जास्त गरम होत असले तरी इतर ठिकाणी वातावरण संमिश्र आहे. याच कारणामुळे या दिवसात सर्दी, खोकला, ताप, घशातील खवखव, अंगदुखी यांसारख्या समस्या होताना दिसतात. त्यामुळे सध्या डॉक्टरांकडेही मोठी गर्दी बघायला मिळत आहे.
असे अनेक घरगुती उपाय आहेत जे वापरण्याचा सल्ला आयुर्वेद एक्सपर्ट देतात. किचनमधील असंच एक सर्वात स्वस्त औषध म्हणजे मीठ. घशात जेव्हाही खवखव किंवा वेदना होत असतील तर डॉक्टर नेहमीच मिठाच्या पाण्याची गुळणी करायला सांगतात. याने वेगवेगळे फायदेही होतात.
नियमितपणे गरम पाण्याने गुळणी केल्यास सर्वात मोठा फायदा हा होतो की, तुमच्या तोंडाची कधी दुर्गंधी येणार नाही. तसेच तोंडाच किटाणूही होणार नाहीत. एक ग्लास गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ मिश्रित करून ५ ते ६ वेळा गुळणी करा. रात्री हे केल्याने तुम्हाला झोपही चांगली लागेल. तसेच घशाची खवखवही दूर होईल. चला जाणून घेऊ याचे आणखीन काही फायदे...
१) दात आणि हिरड्यांची स्वच्छता
मिठ आणि गरम पाण्याने गुरळा केल्याने घशातील घाण साफ होते. या पाण्याने गुरळा केल्याने तोंडाची चांगल्याप्रकारे स्वच्छता होते. हे पाणी एकप्रकारे माऊथ वॉश सारखं काम करतं.
२) सर्दी - खोकला
जर तुम्हाला सर्दी खोकला, घशात खवखव किंवा वेदना होत असतील तर गरम पाणी आणि मिठाने गुळणी केल्यास वेदना दूर होतील. याने घशात आलेली सूजही कमी होते आणि बॅक्टेरिया नष्ट होतात.
३) टॉन्सिलची समस्या असेल तर...
टॉन्सिल आपल्या शरीरात आधीपासूनच असतो. टॉन्सिल आपल्या जिभेच्या मागच्या बाजूस असतो. जर काही कारणाने संक्रमण झालं तर यात सूज येते आणि वेदनाही होऊ लागतात. यापासून आराम मिळवण्यासाठी रोज सकाळी गरम पाण्याने गुळण्या करा.
४) दातातील किड्यांची होईल सफाई
जर दातांमध्ये किंवा हिरड्यांमध्ये सूज असेल, रोगजंतू झाले असतील किंवा कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर मीठ आणि कोमट पाण्याने गुळणी करा. याने वेदना आणि सूज कमी होईल.
५) तोंड आल्यास मिळतो आराम
गरम पाणी आणि मिठाच्या पाण्यानं गुळणी केल्यास तोंड येणे, जीभ लाल होणे, तोंडाला जास्त पाणी सुटणे या समस्या दूर होतात.
६) तोंडाचा पीएच बॅलन्स
अनेकदा डॉक्टरही असे करण्याचा सल्ला देतात कारण मिठाच्या पाण्याने गुळणी केल्यास तोंडाचा नैसर्गिक पीएच बॅलन्स ठेवण्यास मदत मिळते. बॅक्टेरियामुळे डिस्टर्ब झालेला तोंडाचा पीएच बॅलन्स या पाण्याने गुळणी केल्यास योग्य होतो.
७) बंद नाकापासून आराम
जर तुम्हाला सर्दी झाली असेल आणि त्यामुळे तुमचं नाक बंद झालं असेल तर मीठ आणि कोमट पाण्याने काही वेळा गुळणी करा. याने नाक मोकळं होईल. जर सायन्सबाबत समस्या असेल तेव्हाही या पाण्याने गुळणी केल्यास आराम मिळेल.
८) घशाजवळ आणि तोंडाजवळ रक्तप्रवाह
घसा, तोंड आणि आजूबाजूच्या अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढण्यासाठी मीठ आणि गरम पाण्याने गुरळा केल्यास फायदा होईल. अनेकदा नाक किंवा घशाच्या इन्फेक्शनमुळे डोकेदुखी होते. अशात या पाण्याने गुळणी केल्यास आराम मिळेल.
९) ताप असल्यास फायदेशीर
नियमितपणे मिठाच्या पाण्याने गुळणी केल्यास तापाची लक्षणेही कमी करण्यासही मदत मिळते. त्यासोबत मिठाच्या पाण्यात कपडा भिजवून कपाळावर ठेवल्यास तापही कमी होतो.