Food For Strong Bones: आपण नेहमीच हे बघतो की, ज्या लोकांचं वय सामान्यपणे 40 पार होतं त्यांची हाडे कमजोर होऊ लागतात. खासकरून महिलांसोबत असं जास्त होतं. हाडे कमजोर झाल्यावर रोजची कामं करण्यात सगळ्यांनाच समस्या होतात. त्यामुळे गरजेचं असतं की, या वयात आपणं हाडांची खूप काळजी घेतली पाहिजे. हाडे कमजोर होण्याची समस्या आपल्याच चुकींच्या सवयींमुळे होत असते. अशात कोणते पदार्थ किंवा फळं खाल्ल्याने हाडे मजबूत होतील हे बघुया.
जर तुम्हाला वाटत असेल की, 40 वयानंतरही तुमची हाडे मजबूत रहावी. यासाठी तुम्ही कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी सहीत अनेक न्यूट्रिएंट्स असलेले पदार्थ खावेत. एका डॉक्टरांनी सांगितलं की, हाडे मजबूत करण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असावा.
- दूध आणि दुधाचे पदार्थ
- हिरव्या पालेभाज्या
- ओट्स
- खिचडी
- होल ग्रेन
- फळं
- गाजर
- मटर
- अंजीर
- सलाद
- नट्स
- अंडी
- रताळे
- मशरूम
- मूळा
- पालक
या गोष्टींची घ्या काळजी
- कच्चा सलाद तुम्ही जेवणादरम्यान खाऊ शकता.
- दिवसातून दोन वेळ दूध नक्की प्या. याने कॅल्शिअम वाढेल.
- तसेच तुम्ही फॅट कमी असलेला दुधाचे पदार्थ खाऊ शकता.
- जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर वेगवेगळ्या डाळींचं सेवन करा.
- दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्ला पाणी प्या.
- वेगवेगळी फळं खा आणि त्यांचा ज्यूसही प्या.
- दिवसातून कमीत कमी अर्धा तास फिरा आणि हेवी वर्कआउट करा.