वयानुसार स्नायूंमध्ये बदल होत राहतात. वय वाढले की स्नायू, हाडं कमजोर होतात. मात्र सध्या तरुणवयातच हाडांच्या समस्या सुरु झाल्या आहेत. तरुणवयातच गुडघेदुखी, पाठीचा कणा संबंधित आजार सुरु झाले आहेत. स्नायूंच्या, हाडांच्या मजबुतीसाठी शरीरात कॅल्शियमचे प्रमाण पुरेसे असले पाहिजे. वयानुसार हाडांमध्ये सतत बदल होत असतात. तरुणपणी हे बदल झपाट्याने होत असतात. ३० वर्षापर्यंत बोन मास चा किती विकास होतो यावर ऑस्टियोपोरोसिसची परिस्थिती अवलंबून असते. पण तुम्हाला जर म्हातापणीही हाडं, स्नायू हे मजबुत ठेवायचे असतील तर काही सवयी लावणे गरजेचे आहे. कॅल्शियम परिपूर्ण आहार
स्नायूंच्या, हाडांच्या मजबुतीसाठी आहारात कॅल्शियमचा समावेश असावा. हाडं कमजोर, मजबूत बनत राहतात. ही प्रक्रिया सतत सुरु असते. तर हाडांच्या मजबुतीकरणासाठी कॅल्शियम महत्वाचे आहे.लहान मुलांमध्ये हाडांचे मजबुतीकरण होणे गरजेचे असते. म्हणूनच लहानपणी आपल्याया दूध पिण्याचा आग्रह होत असतो.
व्हिटॅमिनची कमतरता होऊ देऊ नका
कॅल्शियम एवढेच हाडांसाठी, स्नायूंच्या बळकटीकरणासाठी व्हिटॅमिन गरजेचे आहे. यातही व्हिटॅमिन डी शरीरासाठी आरोग्यदायी आहे. संशोधनानुसार, ज्यांना पुरेसे व्हिटॅमिन डी मिळत नाही विशेषकरुन वयस्कर आणि लहान मुले यांच्यातील हाडांची घनता कमी होते. यासाठी रोज सकाळी कोवळ्या उनहात १५ ते २० मिनिटे बसा असा सल्ला दिला जातो.
प्रोटीन असलेला आहार घ्या
हाडांच्या, स्नायूंच्या बळकटीकरणासाठी आहारात प्रोटीन मुबलक असावे. प्रोटीन कॅल्शियम शोषून घेण्याचे काम करते. प्रोटीन नसेल तर हाडांची बळकटीप्रकरणाची प्रक्रिया सुरळीत होत नाही.
हाडांच्या मबबुतीकरणासाठी रोज चालणे, धावणे गरजेचे आहे. याशिवाय पायऱ्या चढणे हादेखील एक उत्तम व्यायाम आहे.