(Image Credit : biospace.com)
हिवाळा हा फ्लू इन्फेक्शन होण्यासाठी ओळखला जातो. सर्दी-खोकला असो वा वायरल इन्फेक्शन दोन्हींचा धोका हिवाळ्यात अधिक वाढतो. हिवाळ्यात हवा थंडी आणि शुष्क असते. ज्यामुळे वायरस शरीरावर जास्त वेळ प्रभाव करतात. जसंजसं तापमान कमी होतं धोका तेवढा जास्त वाढत जातो. सामान्यपणे या स्थितीला इन्फ्लूएंजा असं म्हटलं जातं. हिवाळ्यात होणारी ताप, सर्दी आणि खोकला व्हायरसमुळे होतो. इन्फ्लूएंजा व्हायरसचा हल्ला सामान्यपणे नाक, घशाला प्रभावित करतो. अनेकदा ही सामान्य समस्या गंभीर होऊ शकते.
अनेकदा परदेशी फ्लू जास्त धोकादायक असतो. झिका व्हायरस, स्वाइन फ्लू, इबोला व्हायरससारख्या समस्या फार गंभीर असतात. सामान्य फ्लू प्रमाणेच या व्हायरसचीही लक्षणे असतात. हिवाळ्यात फ्लूचा धोका वाढतो. पण शरीराचं इम्यून सिस्टीम जर मजबूत असेल तर कितीही घातक व्हायरससोबत लढण्यासाठी इम्यून सिस्टीम बूस्ट करण्यासाठी काही उपाय करायला हवेत.
इम्यून सिस्टीम बूस्ट कसं कराल?
हेल्थ एक्सपर्ट मानतात की, इम्यून सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीचा थेट संबंध व्यक्तीच्या खाण्या-पिण्याशी असतो. जर तुमचं खाणं-पिणं चांगलं असेल तर तुमचं इम्यून सिस्टीम मजबूत राहतं. अशात प्रश्न समोर येतो की, इम्यून सिस्टीम मजबूत करण्यासाठी काय-काय उपाय केले जाऊ शकतात. चला जाणून घेऊ उपाय.....
- हिवाळ्याची सुरूवात होताच खाण्या-पिण्यात बदल करणं गरजेचं असतं. आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा जे शरीराचं इम्यून सिस्टीम मजबूत करतील. जेवणातही योग्य व्हिटॅमिन्स आणि पोषक तत्व आवर्जून असावेत. हिरव्या भाज्यांसोबतच हंगामी भाज्यांचं आणि फळांचं सेवन केल्याने इम्यून सिस्टीम मजबूत करण्यास मदत मिळते.
- नियमितपणे एक्सरसाइज केल्याने सुद्धा फ्लू व्हायरसपासून तुमचा बचाव होऊ शकतो. कारण जेलोक रोज एक्सरसाइज करतात, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली असते. हॉर्वर्ड विश्वविद्यालयाच्या एका रिसर्चनुसार, जे लोक एक्सरसाइज करत नाहीत, त्यांना फ्लू इन्फेक्शन होण्याचा धोका अधिक राहतो.
- आयर्नची कमतरता असलेल्यांवर फ्लूचा व्हायरस लवकर हल्ला करतो. अशात व्यक्तीने आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे ज्यात आयर्न भरपूर असेल. त्यासोबतच जर तुमच्यात नेहमी आयर्नची कमतरता राहत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेळीच योग्य औषधं घेतली पाहिजे.
- व्हायरस इन्फूएंजा व्हॅक्सीन घेणंही गरजेचं आहे. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, फ्लूच्या व्हायरसपासून बचाव करण्याचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे व्यक्तीने व्हायरसची व्हॅक्सीन लावून घ्यावी. फ्लूचं लसीकरण केल्याने तुम्ही अनेकदा संक्रमण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊनही आजार तुमच्यापासून दूर राहतात.
- चांगली झोप घेणं गरजेचं आहे. तज्ज्ञ मानतात की, जे लोक चांगली झोप घेतात, त्यांची इम्यून सिस्टीम इतरांच्या तुलनेत चांगली राहते. इम्यून सिस्टीम चांगली असल्याने फ्लू व्हायरसचा धोका कमी असतो.
- तसेच स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही तुमच्या शरीराची व्यवस्थित स्वच्छता केली, घराची स्वच्छता केली तर व्हायरसपासून तुमचा बचाव होऊ शकतो. इम्यून सिस्टीम चांगली ठेवण्यात स्वच्छतेची मोठी भूमिका असते.