Brain Gut Connection : अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात. संतुलित आहार घेतला तरच मेंदुचं आरोग्य चांगलं राहतं. असं केलं नाही तर तुमच्या मेंदुचं आरोग्य बिघडतं. कारण पोट आणि मेंदू यांच्यात खास संबंध असतो.
पोटाच्या समस्या थेट मानसिक आरोग्यावर प्रभाव पाडतो. यात सगळ्यात घातक बद्धकोष्ठतेची समस्या आहे. जर तुम्हाला सुद्धा खूप दिवसांपासून ही समस्या असेल तर याने तुमची स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते. याने मेंदुची काम करण्याची क्षमता प्रभावित होते आणि डिमेंशिया म्हणजे विसरण्याची समस्या होते. त्यामुळे कधीही बद्धकोष्ठतेची समस्या हलक्यात घेऊ नका.
मेंदुवर कसा प्रभाव करते बद्धकोष्ठतेची समस्या?
अल्झायमर असोसिएशन इंटरनॅशनलच्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, बद्धकोष्ठतेची समस्येवर जर वेळीच उपचार केले नाही तर याने मेमरी लॉल म्हणजे डिमेंशिया होण्याचा धोका असतो. याने विचार करण्याची आणि गोष्टी समस्याची किंवा लक्ष केंद्रीत करण्यासही समस्या येते. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, दिवसातून दोन वेळ शौचास जाणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या जास्त बघायला मिळते. या रिसर्चमध्ये ब्रेन आणि गट हेल्थमध्ये खास संबंध असल्याचं सांगण्यात आलं आहे.
गॅस्ट्रोलॉजी एक्सपर्ट्स सांगतात की, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढते. कमी वयात सुद्धा ही समस्या बघायला मिळते. या समस्येत पोट चांगलं राहत नाही आणि मेंदुवर याचा प्रभाव पडतो. या समस्येमुळे केवळ मेंदुच्या क्रियांवरच नाही तर कोलन कॅन्सर आणि टाइप-३ डायबिटीसचाही धोका राहतो. इतकंच नाही तर यामुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरही होऊ शकतो.
बद्धकोष्ठतेवर उपाय
डॉक्टरांनुसार, डाएटमध्ये जर फायबर कमी असेल आणि पाणीही कमी पित असाल बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. याचा अर्थ हा आहे की, पोट साफ होत नाही. यामुळे तोंडाची दुर्गंधी येऊ शकते आणि अनेकदा उलटी सुद्धा येते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा. दिवसभर भरपूर पाणी प्या. तसेच तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाऊ नका.